शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठाचे नाव सांगून सराफाची फसवणूक करणारा पोलिस हवालदार निलंबित; विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 20:24 IST

वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून ८ लाख २२ हजार २२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेतले होते.

पुणे : शहर पोलिस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून एका सराफ व्यावसायिकाला ८ लाख २२ हजार २२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेतले. व्यावसायिकाने पैसे मागितल्यानंतर टाळाटाळ करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका पोलिस हवालदारास निलंबित करण्यात आले आहे.

गणेश अशोक जगताप, असे निलंबनाची कारवाई झालेल्या विशेष शाखेच्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. पोलिस हवालदार जगताप यांनी औंध येथील एका ज्वेलर्सच्या दुकानातून शहर पोलिस दलातील एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून ८ लाख २२ हजार २२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेतले होते. सराफ व्यावसायिकाने जगताप यांच्याकडे दागिन्याच्या पैशाची मागणी केल्यानंतर सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी देऊन पैसे न देता त्यांची फसवणूक केली. यानंतर सराफ व्यावसायिकाने जगताप यांच्याविरोधात विशेष शाखेकडे तक्रार केली होती. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून जगताप यांना संबंधित सराफ व्यावसायिकास दागिने किंवा पैसे देण्याचे आदेश दिले होते. मात्र, जगताप यांनी या आदेशाचे पालन केले नाही.

शेवटी विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप यांच्यावर बेजबाबदार, बेफिकीर, नैतिक अधःपतन आणि गैरवर्तनाचा ठपका ठेवत मुंबई पोलिस (शिक्षा व अपिले) नियम १९५६ मधील नियम ३ (१) (अ-२) व नियम ५च्या तरतुदीनुसार आणि मुंबई पोलिस अधिनियम १९५१ मधील नियम २५ नुसार निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन कालवधीत कोणत्याही प्रकारची खासगी नोकरी किंवा व्यवसाय स्वीकारू नये, तसेच निलंबन कालावधीमध्ये दररोज पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस निरीक्षकासमोर हजेरी लावण्याचे आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड