शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

गेटवर लवकर पाठव.. फोन बंद झाला अन्...; २० वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:12 IST

ती नेहमीप्रमाणे बसने घरी परतत असे, मात्र  त्या दिवशी ती घरी पोहोचली नाही. भावाने औषधालयात चौकशी केली असता

उरुळी कांचन  -  कोरेगाव मुळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील २० वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून गुन्हे शाखा तपासात सक्रिय आहे. मृत तरुणीचे नाव पूनम विनोद ठाकूर (वय २०, रा. गगन आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मुळ, मूळ गाव, उत्तर प्रदेश) असे असून ती उरुळी कांचन येथील एका आयुर्वेदिक औषधालयात काम करत होती.अधिकच्या माहितीनुसार, मंगळवारी (१४ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहा वाजता पूनम कामावरून सुटली होती. ती नेहमीप्रमाणे बसने घरी परतत असे, मात्र  त्या दिवशी ती घरी पोहोचली नाही. भावाने औषधालयात चौकशी केली असता, ती कामावरून निघाल्याचे समजले. यादरम्यान, तिने  आपल्या मावस भावाशी शेवटचा फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी तिने सांगितले होते, सुजितला गगन आकांक्षा सोसायटीच्या गेटवर लवकर पाठव.  त्यानंतर तिचा फोन बंद झाला. यानंतर कुटूंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली.दरम्यान, शोधमोहीम सुरू असताना पूनमचा मोबाईल फोन, पाण्याची बाटली, पुरुषांचा बूट आणि एक सॅंडल गगन आकांक्षा सोसायटीजवळील प्रयागधाम रोडवर सापडली. संशय वाढल्याने कुटुंबीयांनी शोध अधिक तीव्र केला. शेवटी रस्त्यापासून सुमारे ३०० फूट अंतरावर मुरमाच्या दोन ढिगाऱ्यांमध्ये पूनमचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे व उरुळी कांचन पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पूनमला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास उरुळी कांचन पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेकडून सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास केला जात आहे.न्यायासाठी नातलगांचे आंदोलनपोस्टमार्टमनंतर पूनमचा मृतदेह नातलगांनी उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोर आणून “आम्हाला न्याय द्या” अशी मागणी केली. सुमारे एक तासाहून अधिक काळ रुग्णवाहिकेमध्ये मृतदेह ठेवून नातेवाईक व मित्रपरिवाराने आंदोलन केले. या वेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Young Woman Murdered Near Urali Kanchan, Investigation Underway

Web Summary : A 20-year-old woman was found murdered near Urali Kanchan, Pune. She was last heard from on a call saying, "Send Sujit to the gate." Police are investigating the case, and relatives are demanding justice.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र