शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

चिनी गुन्हेगारासोबत संगनमत करून चित्रपट निर्माता असा करायचा फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:38 IST

यूट्यूबवर शेअर केलेल्या स्टॉक मार्केट संदर्भातील व्हिडीओखालील व्हॉट्सॲप लिंकवरून गुंतवणुकीचे आमिष दाखवणाऱ्या ॲबॉट वेल्थ नावाच्या ॲपवर नोंदणी केली होती.

पिंपरी : चिनी नागरिकाच्या संपर्कात राहून सायबर फसवणुकीसाठी आपले बँक खाते पुरवणाऱ्या चित्रपट निर्मात्याला पिंपरी-चिंचवडच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात ८६ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.शिवम बाळकृष्ण संवत्सरकार (रा. एरंडवणे, पुणे), असे संशयिताचे नाव असून, तो स्वत:ला चित्रपट निर्माता असल्याचे सांगतो; परंतु तपासादरम्यान त्याने चिनी नागरिक बाम्बिनी याच्याशी संपर्कात राहून बँक खात्याचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.फिर्यादी यांनी यूट्यूबवर शेअर केलेल्या स्टॉक मार्केट संदर्भातील व्हिडीओखालील व्हॉट्सॲप लिंकवरून गुंतवणुकीचे आमिष दाखवणाऱ्या ॲबॉट वेल्थ नावाच्या ॲपवर नोंदणी केली होती. सुरुवातीला ५०० रुपयांची गुंतवणूक करून त्यांना काही दिवसांत पाच कोटी १५ लाखांचा नफा असल्याचे दाखवण्यात आले; पण पैसे काढण्याचा प्रयत्न करताच विविध चार्जेसच्या नावाखाली पैशांची मागणी होऊ लागली. त्यावरून संशय बळावल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात ५७ लाख ७० हजार ६७० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.बँक खात्याचा तपास आणि संशयिताचा शोधतपासादरम्यान संशयिताने वापरलेले आयडीएफसी बँकेतील खाते हे ‘बालाजी एंटरप्रायजेस’ या नावाने सुरू करण्यात आले होते. पोलिस उपनिरीक्षक सागर गोमन आणि त्यांच्या पथकाने डेक्कन पोलिस ठाण्याच्या मदतीने संशयिताचा शोध घेतला. सुरुवातीला तो ‘मी चित्रपट निर्माता आहे, अशा गोष्टी कशा करीन?’ असे उत्तर देत होता. मात्र, पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी विश्वासात घेऊन केलेल्या सखोल तपासात त्याने चिनी संशयिताच्या सांगण्यानुसार खाते उघडले व फसवणुकीसाठी वापरले, हे कबूल केले.खात्यावर १५ पेक्षा जास्त फसवणुकीच्या तक्रारीतपासात उघड झाले की संशयिताच्या खात्यावर एकूण ८६ लाख ४३ हजार १११ रुपये जमा झाले होते आणि त्या खात्यावर १५ पेक्षा जास्त फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संशयिताच्या मोबाइलमध्ये आणखी दोन बँक खाती फसवणुकीसाठी तयार केल्याचे पुरावे मिळाले आहेत. वेळीच अटक केल्यामुळे इतर अनेक लोकांची फसवणूक टळली, असे पोलिसांनी सांगितले. संशयिताकडून दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून बँक खात्याची माहिती तपासणीसाठी घेतली आहे. तसेच चिनी नागरिक बाम्बिनी आणि इतर सहआरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी