शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन मुलांना दारूचे वाटप; मनसेची धडक कारवाई;पब सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 13:25 IST

लष्कर परिसरातील राज बहादुर मिल्स येथील पबमध्ये फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू पुरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पुणे : लष्कर परिसरातील राज बहादुर मिल्स येथील किकी  पबमध्ये फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू पुरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) कार्यकर्त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह थेट पबवर धडक देत ही पार्टी बंद पाडली.ही कारवाई मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. विभागाध्यक्ष हेमंत बोळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस, व्हीव्हीआयटीसह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी १७ ते २१ वयोगटातील शेकडो तरुण-तरुणींना कोणतेही ओळखपत्र न पाहता थेट प्रवेश देत सर्रास दारू विक्री केली जात होती.मनविसेला माहिती मिळताच त्यांनी उत्पादन शुल्क विभागाला कळवले. त्यानंतर पबमध्ये छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान अनेक अल्पवयीन मुले व मुली दारू पिताना आणि सिगारेट ओढताना आढळले. पब चालक व आयोजक यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने प्रशासनाने तातडीने पार्टी बंद करून पब सील केला. कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या आंदोलनात महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणी मनसेने कठोर भूमिका घेतली आहे. “फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीनांना व्यसनाधीन केले जाणार नाही. पुढे जर अशा पद्धतीने पार्टीचे आयोजन झाले आणि विद्यार्थ्यांना दारू पुरवली, तर संबंधित पबची एकही काच शिल्लक ठेवणार नाही, संपूर्ण पब उद्ध्वस्त केला जाईल,  असा इशारा विभागाध्यक्ष हेमंत बोळगे यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी