Pune Rape Case Update ( Marathi News ) : स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. गेल्या चार दिवसांपासून आरोपी गाडे याचा पोलीस शोध घेत होते. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनीस्वारगेट बसस्थानकाजवळील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. या फुटेजमधून एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा घटनेनंतर पुढे दोन तास स्वारगेट बसस्थानकावर फिरत असल्याचे दिसत आहे.
तरुणीवर अत्याचार केले, गावी जाऊन किर्तन ऐकलं; गुन्हा दाखल होताच झाला फरार, वाचा घटनाक्रम
आरोपी दत्तात्रय गाडे याने पहाटे स्वारगेट बसस्थानकात तरुणीला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर बसमध्ये घेऊन जात लैंगिक अत्याचार केले. यानंतर आरोपी पुढचे दोन तास स्वारगेट बसस्थानकात फिरस असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आरोपी पुन्हा दुसऱ्या तरुणीच्या शोधात होता असं या फुटेजमध्ये दिसत आहे.
आरोपी नातेवाईकांच्या घरी जाऊन सरेंडर व्हायचंय म्हणाला
आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे तो पोलिसांना ट्रॅक होत नव्हता. पण तो शिरुर तालुक्यातील गुनाट या गावी अनेकांना दिसला होता. यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध त्याच परिसरात घेतला. काल दिवसभर आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध शेतात घेतला. यासाठी ड्रोनचा वापरही केला, पण यात पोलिसांना अपयश आले. पण पोलिसांनी शोधमोहिम थांबवली नाही. रात्रीही शोध सुरूच ठेवला. आरोपी काहीतरी खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी बाहेर येणार हे नक्की होते, यामुळे पोलिसांनी शोधमोहिम सुरू ठेवली.
रात्री उशीरा नातेवाईकांच्या घरी मदत मागायला गेला
गुनाट गावातील एका नातेवाईकाच्या घरी आरोपी दत्तात्रय गाडे रात्री १२ वाजता गेला होता. यावेळी त्याने तिथे खूप भूक लागली आहे. काहीतरी खायला द्या. यावेळी नातेवाईकांनी त्याला काही खायला न देता एक पाण्याची बाटली भरुन दिली. यावेळी गाडे याने मी जे केलं ते चुकीचं केलं, मला पश्चाताप झाला आहे, पोलिसांना सरेंडर व्हायचं आहे, असं म्हणाला. त्यानंतर तो पाण्याची बाटली घेऊन तिथून निघून गेला. यानंतर नातेवाईकांनी ही सर्व माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेचच चक्रे फिरवत आसपासच्या शेतात त्याचा शोध घेतला. रात्री दीड वाजता पोलिसांना तो शेतात सापडला.