शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 09:59 IST

Pune Crime News : पुण्यातील धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Pune Crime News : पुण्यातून  एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन दिवसापूर्वी एका स्कूलबस चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी आधी मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. 

मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती. यावेळी तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून त्या तरुणीचे आणि मित्राचे फोटो काढले. यानंतर त्या तिघांनी तरुणीला कारमध्ये बसवून कार येवलेवाडीजवळ घेऊन गेले. या ठिकाणी तरुणीवर अत्याचार केले. यानंतर आरोपींनी तरुणीला खडी मशीन चौकात सोडून पसार झाले. 

तिघांविरोधात गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात मित्रासोबत २१ वर्षीय तरुणी गेली होती. यावेळी या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नुकतेच दोन दिवसांपूर्वीच बोपदेव घाटात मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीचे कारमधून एका तरुणाने अपहरण केले होते. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग करून आरोपीने तरुणीला सोडून पळून गेला होता, त्यानंतर आता पुन्हा बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. 

संबंधित पीडित मुलगी ही मुळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथील राहणारा आहे .सदर दोघे पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. गुरुवारी रात्री सदर दोघे दुचाकी वर बोपदेव घाट या ठिकाणी फिरायला गेले होते. त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे . 

या घाटात रात्रीच्यावेळी कोणच नसते, यामुळे कोणही मदतीला नव्हते. या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला.

याबाबतची माहिती कोंढवा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी येऊन घडलेल्या घटनेची माहिती घेत अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पाच वाजता याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी