शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
3
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
4
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
5
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
6
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
7
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
8
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
9
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
10
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
11
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
12
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
13
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
14
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
15
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
16
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
17
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
18
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
19
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
20
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
Daily Top 2Weekly Top 5

२१ किलो चांदी, मुकुट, सिंहासन; खरपुडी खंडोबा मंदिरात चाळीस लाखांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:07 IST

सकाळी पहाटे पाच वाजता पुजारी देवपूजेसाठी आले असता चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे खरपुडी परिसरात खळबळ उडाली आहे.

राजगुरूनगर - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे (प्रति जेजुरी) खरपुडी खंडोबा (ता. खेड) मंदिरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चांदीचे दागिने आणि दानपेटी फोडून अंदाजे चाळीस लाख रुपये किंमतीचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे.अधिकच्या माहितीनुसार, खरपुडी खंडोबा मंदिर डोंगरावर असून, शुक्रवारी मध्यरात्री मंदिर परिसरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला. मुख्य मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. खंडोबा–म्हाळसा व बानूच्या मूर्तीवरील चांदीचे हार, उत्सव मूर्ती, स्वयंभू पिंडीचे चांदीचे कवच, देवाची पगडी, चांदीचे सहा हार, बानू–म्हाळसा मुकुट, सिंहासन, वाघ मूर्ती अशा मिळून सुमारे २१ किलो चांदीसह दानपेटीत असलेले अंदाजे ६० ते ७० हजार रुपये असा एकूण चाळीस लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला.सकाळी पहाटे पाच वाजता पुजारी देवपूजेसाठी आले असता चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे खरपुडी परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा संपूर्ण बंद असल्याचे समोर आले आहे. चोरीच्या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, घटनास्थळी पोलिस दाखल होऊन पंचनामा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Theft at Kharpudi Khandoba Temple: Silver, Crown, Throne Stolen

Web Summary : Thieves stole silver ornaments, a crown, and cash from the donation box at Kharpudi Khandoba Temple near Rajgurunagar. Valued at approximately 4 million rupees, the theft was discovered early Friday morning by the temple priest. Police are investigating; CCTV was inactive.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र