पिंपरी : प्रेमप्रकरणातून झालेल्या वादानंतर संतापलेल्या तरुणाने दोन साथीदारांच्या मदतीने एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना शनिवारी (१ नोव्हेंबर) दुपारी सव्वाचारच्या सुमारास हिंजवडी येथे घडली.
योगेश भालेराव (वय २५, रा. कासारसाई), त्याचा मित्र प्रेम लक्ष्मण वाघमारे (वय २०) यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणी ही मूळची नाशिक येथील असून सध्या ती हिंजवडीतील साखरे वस्ती परिसरात राहण्यास आहे.
१८ वर्षीय तरुणीच्या डोक्यात आणि मानावर वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून संशयितांनी आपसात संगनमत करून १८ वर्षीय तरुणीच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर कोयत्याने वार करीत तिला गंभीर जखमी केले.
तिच्यावर हिंजवडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर योगेश भालेराव याने आपल्या दोन साथीदारांसह तरुणीवर कोयत्याने वार केले.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. हिंजवडी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत हा प्रकार प्रेमसंबंधातून झालेल्या वैमनस्यातून घडल्याचे समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Summary : In Hinjawadi, a young man, fueled by a lovers' quarrel, attacked a Nashik woman with a sickle, critically injuring her. Police arrested the assailant and two accomplices. The victim is hospitalized with severe head and neck wounds.
Web Summary : पुणे के हिंजवडी में एक युवक ने प्रेम प्रसंग के चलते नासिक की एक युवती पर दरांती से हमला कर दिया, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गई। पुलिस ने हमलावर और उसके दो साथियों को गिरफ्तार कर लिया है। पीड़िता अस्पताल में भर्ती है।