पुणे : कंपनीत ओळख झालेल्या महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले. पण तिचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून विवाहित महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाने अटी शर्तींवर जामीन मंजूर केला.
सचिन राजू शिंदे असे जामीन झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने ॲड. नीलेश वाघमोडे मार्फत उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यांना ॲड. ऋषिकेश दराडे यांनी सहकार्य केले. ही घटना २०२२ मध्ये घडली. एका लॉज मध्ये कामगाराला भितींवर रक्त उडालेले दिसले. बाथरूम उघडले तर तिथे महिला मृतावस्थेत पडलेली दिसली. लॉज मालकाने पोलिसांना फोन केला. सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी महिलेबरोबर जाताना दिसल्याने आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी तीन वर्षांपासून कारागृहात आहे. सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळल्यावर आरोपीने उच्च न्यायालय मध्ये दाद मागितली. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, आरोपी हा मारताना कुठे दिसत नाही.
आरोपी हा फुटेज मध्ये रात्री ९ वाजता माघारी जाताना दिसत आहे अणि महिला ही दुसऱ्या दिवशी ११ वाजता मृत झालेली दिसते. एवढ्या वेळेत तिथे कोणी गेले नाही. आरोपी ३ वर्ष कारागृहात आहे. त्यामुळे केस चालायला वेळ जाणार आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.