शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

विवाह समारंभात पाटाखाली लिंबे सापडल्याने विवाहितेचा छळ;पती, सासूसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:20 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार तरुणीचे अंबरनाथ येथील तरुणाशी मे २०१९ मध्ये विवाह झाला होता. 

पुणे : विवाह मंडपात पाटाखाली लिंबे सापडल्याने काळी जादू केल्याचा आरोप करून सासरकडील नातेवाइकांनी विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसंनी पती, सासूसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती, सासू यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार तरुणीचे अंबरनाथ येथील तरुणाशी मे २०१९ मध्ये विवाह झाला होता. 

विवाहातील विधी करताना तरुणीच्या पाटाखाली दोन लिंबे सापडली. विवाह समारंभ पार पडल्यानंतर तरुणी सासरी आली. तेव्हा विवाहात पाटाखाली सापडलेली लिंबे, तसेच कौटुंबिक वादातून तरुणीला टोमणे मारण्यास सुरुवात करण्यात आली. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली. जाचामुळे कंटाळून तरुणी माहेरी निघून आली. त्यानंतर तिने नुकतीच काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

विवाहितेचा छळप्रकरणी आणखी एक गुन्हा...दरम्यान, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी पती, सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २४ वर्षीय तरुणीने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विवाहानंतर तरुणीचा छळ सुरू करण्यात आला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करण्यात आली. विवाहात दिलेले दागिने काढून घेतले. पैसे न दिल्यास घर सोडून जा, अशी धमकी पती, सासू, नणंदेने दिल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी