शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

कोंढव्यात तरुणीवर अत्याचार; पुणे शहरातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:28 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा संतप्त सवाल

पुणेकोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत शिरलेल्या एकाने संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली. कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी करून आरोपी सदनिकेत शिरल्याचे उघडकीस आले असून, पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.  यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी  महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. कायदा व सुव्यवस्था रामभरोसे, जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.  पुणे शहराची कायदा व सुव्यवस्था जागतिक पातळीची असणे गरजेचे आहे. मात्र, केंद्रातील मोदी-शाह व राज्यातील देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारच्या अवकृपेने पुणे शहराची कायदा व सुव्यवस्था अक्षरशः रामभरोसे आहे. पुणे शहरातील आमच्या माता भगिनी स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीत हे दाहक वास्तव आहे. पुणे शहरातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.नेमकं काय घडलं ?एका २५ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका २८ ते ३० वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कल्याणीनगर येथील एका आयटी कंपनीत कामाला आहे. ती गेल्या दोन वर्षांपासून शहरातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्यावेळी आरोपी सदनिकेजवळ आला. त्याने दरवाजा वाजवला. तरुणीने सदनिकेचा दरवाजा (सेफ्टी डोअर) उघडला. तेव्हा त्याने कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी केली. तरुणीने त्याला कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे तिला सांगितले आणि दरवाजा उघडण्यास भाग पाडले. तरुणीला बोलण्यात गुंतवून आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. स्प्रे मारल्यानंतर तिचे डोळे जळजळले. त्यानंतर आरोपी सदनिकेत शिरला.त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये तिचे छायाचित्र काढले आहे. मी परत येईन, असा मेसेज त्याने मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिमंडळ ५चे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली आहे. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तरुणीने पोलिसांना केलेल्या आरोपीच्या वर्णनावरून त्याचा शाेध घेतला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी