शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलाचा धाक दाखवून पिता-पुत्राला जिवे मारण्याची धमकी; माजी सैनिक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:09 IST

जेजुरीत तू माझ्या सगळ्यांसमोर अपमान केला. तू येथे बाहेरून पोट भरण्यासाठी आला आहे. तू येथे कसा राहतो हेच पाहतो,अशी धमकी दिली.

पुणे : पुणे जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष दिलीप सोपान यादव व चिरंजीव विनय यादव यांनी लग्न सोहळ्यात आपल्याच पुतण्या व पुतणीवर पिस्टल रोखून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सासवड पोलिस स्टेशनमध्ये माजी राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांची पुतणी केतकी धनंजय झेंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सासवड पोलिस स्टेशनमध्ये दाखल फिर्यादीनुसार, शनिवारी (दि.२४) रोजी सासवड हडपसर रोडवरील महाराजा लॉन्समध्ये फिर्यादी झेंडे यांचे चुलत भाऊ प्रथमेश अजित यादव यांचा साखरपुडा होता. त्या कार्यक्रमाला सहकुटुंब हजर होते. यामध्ये दाजी सुनील धर्मराज कोलते, बहीण मलिनी कोलते, वहिनी सारिका यादव, नीलेश यादव, योगेश यादव असे सर्व नातेवाईक उपस्थित होते. याच कार्यक्रमात विनय यादव, दिलीप यादव, सुनीता यादव, शुभांगी दौंडकर, अक्षता यादव, भुजंग यादव, महेश यादव व इतर हेदेखील उपस्थित होते.

फिर्यादी केतकी झेंडे यांचे चुलत भाऊ चिनू उर्फ संकेत यादव हा झेंडे यांच्या परिवारातील सदस्यांना खिजविण्याच्या हेतूने जवळ येऊन तुम्ही शनिवारी (दि.१७ मे) ''माझ्या लग्नाला दिलीप यादव यांचे कारण देऊन आले नाही, मग आज या साखरपुड्यात कार्यक्रमाला कसे काय आले, यामुळे झेंडे यांचे दोन्ही भाऊ व चुलत भाऊ यांचा चिनू यादव यांच्याशी किरकोळ बाचाबाची झाली. त्यावेळी चुलत भाऊ चिनू हा या कुटुंबातील सदस्यांपासून निघून गेला आणि दिलीप सोपान यादव यांच्या कुटुंबीयांच्या घोळक्यामध्ये गेला.

काही मिनिटांत दिलीप सोपान यादव, विनय यादव, दिलीप यादव, सुनीता यादव, शुभांगी दौंडकर, अक्षता यादव, भुजंग यादव, महेश यादव व इतर झेंडे यांच्या भावांच्या अंगावर धावून आले. यातील अक्षता यादव, सुनीता यादव, शुभांगी दौंडकर यांनी दोन्ही भावांचे अंगावर जाऊन हाताने मारहाण केली. केतकी झेंडे मध्ये पडल्या असता दिलीप यादव व विनय यादव यांनी त्यांना जोरात ढकलून दिले. त्यामध्ये त्यांच्या गळ्यातील अंदाजे ३.३० ग्रॅम वजनाचा टेम्पल हार गहाळ झाला. याच दरम्यान दिलीप व विनय यादव यांनी कंबरेचे पिस्टल काढून झेंडे व त्यांच्या भावांच्या अंगावर ताणून त्यांना जिवे मारण्याची भीती घातली. 

याआधी अदखलपात्र गुन्हायाआधी देखील यादववाडी येथे झेंडे यांचे भाऊ प्रसाद यादव व सागर यादव गेले असता विनय व दिलीप यादव यांनी त्यांच्याकडील पिस्टल उगारून जिवे मारण्याची धमकी दिलेली होती. त्या अनुषंगाने सासवड पोलिस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे केतकी झेंडे यांनी फिार्यादित नमूद केले आहे.

 परस्पर विरोधी तक्रार

फिर्यादी विनय दिलीप यादव यांच्या तक्रारीनुसार सागर बाळासाहेब यादव, प्रसाद बाळासाहेब यादव, सुनील धर्मराज कोलते (सर्व रा. सासवड) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी विनय यांचे वडील दिलीप, आई सुनीता, पत्नी अक्षता, मुलगा राजवीर व शिवतेज यांचेसह यादव कुटुंबीय व नातेवाईक, चुलत भाऊ प्रथमेश अजित यादव याचे साखरपुडा कार्यक्रमासाठी महाराजा लॉन्स सासवड येथे एकत्रित आलो होतो. आमच्या भावकीतील सागर बाळासाहेब यादव व प्रसाद बाळासाहेब यादव यांनी सन २०१५ साली माझे वडील दिलीप यादव यांना मारहाण केली होती. त्याबाबत सासवड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. तेंव्हापासून आमच्यात व त्यांच्यात पूर्ववैमनस्य आहे.

महाराजा लॉन्स येथे माझा भाऊ प्रथमेश अजित यादव याचा साखरपुडा समारंभ झाल्यानंतर घरी जाण्यासाठी मी, माझे वडील, आई, पत्नी व मुले तसेच बहीण शुभांगी संदीप दौंडकर यांचेसह घरी जाण्यासाठी महाराजा लॉन्सचे हॉलमधून बाहेर येत असताना हॉलचे मुख्य दरवाजाजवळ आलो असता आम्हाला आमचे भावकीतील सागर बाळासाहेब यादव, प्रसाद बाळासाहेब यादव व त्यांचे भाऊजी सुनील धर्मराज कोलते या तिघांनी पूर्ववैमनस्यातून राग मनात धरून अडविले व तुम्हाला सांगून पण तुम्ही सासवडला का येता, असे म्हणून सागर यादव याने माझे वडील दिलीप यादव यांना हाताने मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी