शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जिवे मारण्याची धमकी देऊन १५ लाखांच्या खंडणीची मागणी;चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:21 IST

पिंपरी-चिंचवडमध्ये नेऊन एका खोलीत डांबून ठेवत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन १५ लाखांच्या खंडणी मागितली.

पुणे : तरुणाला त्याच्याच घरात डांबून ठेवून जिवे मारण्याची धमकी देऊन बेदम मारहाण करीत १५ लाखांची खंडणी मागितल्याची घटना वाघोली येथे घडली आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांच्या दोन फरार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

गौरव कांबळे (वय २९, रा. चिचंवड, रेल्वे स्टेशनजवळ) ऋषिकेश किशोर शिंदे (वय २४, रा. निगडी) मोहम्मद इरफान खान (वय ३३, रा. नवी मुंबई) मोहम्मद अतहर सोहेल मोहम्मद अनवर (वय २८, रा. मुंबई) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहे. त्यांचे दोन साथीदार पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. याबाबत जवनताराम तीलोकरामजी चौधरी (सारंग) (वय ३७, रा. उबाळेनगर, वाघोली ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चौधरी (सारंग) हे कुटुंबीयासह वाघोलीतील उबाळेनगरात राहायला आहेत. दि. १४ जूनला आरोपी गौरव कांबळे याने साथीदारांना बोलावून तक्रारदाराला त्यांच्या घरी गाठले. तू अक्षय आणि आर्यनला सोडून का दिले आहे, अशी विचारणा केली. अक्षयने घेतलेल्या २५ लाखांपैकी १५ लाख रुपये मला दे, अशी मागणी करीत आरोपी कांबळे साथीदारांच्या मदतीने चौधरी यांना जबरदस्तीने गाडीत बसविले. त्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये नेऊन एका खोलीत डांबून ठेवत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन १५ लाखांच्या खंडणी मागितली. त्यानंतर चौधरी यांचा चुलतभाऊ जेठाराम सारंग यांच्याकडून दहा लाख रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड