शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Video : कोंढव्यातील काकडे वस्तीत कोट्यवधींची रोकड जप्त, तिघांना ताब्यात

By किरण शिंदे | Updated: December 26, 2025 10:41 IST

पोलिसांनी घरातील कपाट उघडताच सर्वांनाच धक्का बसला. या कपाटात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवलेली असल्याचे दिसून आले.

पुणे -  पुणे - शहरातील कोंढवा परिसरातील काकडे वस्तीत अवैध दारूविक्रीवर कारवाई करताना पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. गल्ली क्रमांक दोनमधील एका घरावर छापा टाकला असता, दारू साठ्यासह तब्बल १ कोटी ८५ हजार ९५० रुपयांची रोख रक्कम पोलिसांना आढळून आली.कोंढवा पोलिसांना काकडे वस्तीत अमर कौर उर्फ मद्रीसिंग दादासिंग जुनी (वय ५५) हिच्या घरी पुन्हा बेकायदा गावठी दारूची विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक आफ्रोज पठाण आणि त्यांच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

 झडतीदरम्यान घरातील बेडरूममधील कपाट उघडताच पोलिसांना मोठ्या प्रमाणावर नोटांचे बंडल दिसून आले. रोकड इतक्या मोठ्या प्रमाणावर असल्याने पोलिसांनी तात्काळ नोटा मोजण्याचे मशीन मागवले. रात्री उशिरापर्यंत मोजदाद केल्यानंतर एकूण १ कोटी ८५ हजार ९५० रुपये इतकी रक्कम आढळून आली. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओही समोर आला असून त्यात पोलीस एका खोलीत रोकड मोजताना दिसत आहेत.या प्रकरणी अमर कौर जुनी, दिलदारसिंग दादासिंग जुनी आणि देवाश्री जुनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रोकडचा स्रोत आणि अवैध दारूविक्रीशी असलेला संबंध याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. अमर कौर हिच्यावर यापूर्वीही बेकायदा दारूविक्रीप्रकरणी कारवाई झालेली आहे.इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आल्याने पोलिसांनी प्राप्तिकर विभागालाही याची माहिती दिली असून, काळ्या पैशांच्या व्यवहाराचा तपास होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे कोंढवा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Crores seized in Kondhwa raid; three detained for illegal liquor.

Web Summary : Pune police seized ₹1.85 crore and illicit liquor in Kondhwa, arresting three. The raid on Amar Kaur's residence revealed the cash hoard, prompting an investigation into illegal liquor sales and potential black money dealings. Income Tax department has been informed.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे