शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
4
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
5
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
6
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
7
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
8
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
9
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
10
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
11
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
12
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
13
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
14
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
15
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
16
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
17
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
18
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
19
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
20
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक

पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:07 IST

Pune Crime : पुण्यात वाहतूक पोलिसांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात वाहतूकीचे नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह हवालदारावर एकाकडून पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्यालाच पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न होत असेल तर सामान्यांचे काय असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे.

पुण्यातील लक्ष्मी रोडवरील बुधवार चौकात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणीनगरच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शहरात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह विरोधात कारवाईला सुरु केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही कारवाई सुरु असताना लक्ष्मी रोडवर एका तरुणाला पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्याला कार्यालयात नेले असता त्याने पोलिसांवर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीच्या हातातील लायटर पकडल्याने मोठा अनर्थ टळला.

संजय फकिरा साळवे (रा.पिंपरी चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. लक्ष्मी रोडवरील बुधवार चौकात आरोपी संजय साळवे हा बाईकवरुन जात होता. त्याची वर्तणूक संशयास्पद वाटल्याने कारवाई करणाऱ्या पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर आरोपी काही कारण सांगून बाहेर गेला आणि थोड्यावेळाने हातात पेट्रोलची बॉटल घेऊन आला. आरोपीने पेट्रोल टाकून मारून टाकणार असे म्हणत हवालदार समीर सावंत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. त्यानंतर आरोपीने हातातील लायटरने त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला रोखल्याने मोठी दुर्घटना टळली.

"आरोपीला पकडल्यानंतर  ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यासाठी जवळच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यावेळी हवालदारा समीर सावंत हे त्याची तपासणी करत होते. तो गोंधळ घालत असल्याने त्याला थोड्या थांबण्यास सांगितले. त्यादरम्यान तो ऑफिसमध्ये पेट्रोल घेऊन आला आणि हवालदार समीर सावंत यांच्यावर पेट्रोल टाकले. त्यावेळी मीसुद्धा तिथे उभी होते. मी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने मी समीर सावंतला पेट्रोल टाकून जाळून टाकतो असं म्हटलं आणि माझ्या अंगावरही पेट्रोल टाकले. शुक्रवारी संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला," अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस