शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

Pune Crime: विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:50 IST

पीडितेच्या चेहर्यावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली. या घटनेने विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

पुणे : बोपदेव घाटातील युवतीवरील गैंगरेप, स्वारगेट बसस्थानक परिसरात तरुणीवरील अत्याचारानंतर आता कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले आहे. पीडिता घरी एकटी असल्याची संधी साधत कुरिअर देण्याच्या बहाण्याने आरोपीने सदनिकेत प्रवेश केला अन् पीडितेच्या चेहर्यावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली. या घटनेने विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा पोलिस कसून शोध घेत आहेत.एका २५ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार २८ ते ३० वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत कामाला आहे. ती दोन वर्षापासून कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्यावेळी आरोपीने दरवाजा वाजवला. तेव्हा त्याने कुरिअर  बॉय असल्याची बतावणी केली.

तरुणीने कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे सांगितले आणि सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले. तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. यामुळे तिचे डोळे जळजळले अन् आरोपी सदनिकेत शिरला. त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये तिचे छायाचित्र काढले. मी परत येईन, असा मेसेज त्याने मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडितेने म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिमंडळ ५चे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, गुरुवारी (दि. ३) सकाळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात येत घडलेला प्रकार जाणून घेतला. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.बोपदेव घाट प्रकरणाची आठवणगेल्या वर्षी बोपदेव घाटात एका युवतीवर गँगरेपचा प्रकार घडला होता. त्यानंतर कोंढव्यातील या प्रकारानंतर पुन्हा एकदा शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या १० ते १२ पथकांकडून तपास सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. आरोपी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडितेच्या घरी आला, त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास पीडिता शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्यानंतर तिला वाटले की, तिच्यासोबत काहीतरी गडबड झाली आहे. तिने याबाबत कुटुंबाला सांगितले, त्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास तिच्या भावासोबत ती पोलिस ठाण्यात आली आणि तत्काळ आम्ही गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केल्याची माहिती उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी