शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : खंडणी प्रकरणात आंदेकर टोळी अडचणीत; शिवम आंदेकरसह सहा जणांवर गुन्हा दाखल

By किरण शिंदे | Updated: June 6, 2025 21:23 IST

- शिवम आंदेकर आणि त्याचे साथीदार गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्याकडे दरमहा ५० हजार रुपये खंडणी मागत होते.

पुणे - शहराच्या मध्यवस्तीतील नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या एका मासेविक्रेत्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी टोळीचा प्रमुख शिवम आंदेकरला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यासह पाच ते सहा साथीदारांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ३८ वर्षीय मासेविक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मासे विक्रीचा स्टॉल नाना पेठेतील मच्छी मार्केट परिसरात आहे. शिवम आंदेकर आणि त्याचे साथीदार गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्याकडे दरमहा ५० हजार रुपये खंडणी मागत होते. पैसे न दिल्यास स्टॉल बंद पाडण्याची आणि जीवे मारण्याची धमकीही दिली गेली होती.

तक्रारदाराने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीच्या आधारे फरासखाना पोलिसांनी शिवम आंदेकरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शिवम आंदेकरला ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून तपास सुरूफरासखाना पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत शिवम आंदेकरला अटक केली असून, त्याच्या टोळीतील अन्य सदस्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. मासेविक्रेत्यांकडून पैसे उकळण्याचा हा प्रकार गंभीर असून, या मागे आणखी कोणी गुन्हेगारी टोळी सक्रिय आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

आंदेकर टोळीचा इतिहासशिवम आंदेकर याचे नाव याआधीही काही किरकोळ गुन्ह्यांत आले असून, स्थानिक पातळीवर त्याच्या टोळीची दहशत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेनंतर मच्छी मार्केटमधील इतर विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्या