-किरण शिंदे चंदननगर - चंदननगर-खराडी परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादातून संतापलेल्या वडिलांनी तीन वर्षीय मुलाचा खून केला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळलेल्या माहितीनुसार, पती - पत्नी यांच्यात नेहमीच भांडण होत असे. मात्र यावेळी सुद्धा त्यांच्या भांडण झाली यानंतर वडिलांनी रागाच्या भरात चक्क लेकाला जीवे मारले. आणि पोलिसात लेक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी यादरम्यान चौकशी केली असता धक्कादायक सत्य उघडकीस आले. पोलीस चौकशी दरम्यान, बेपत्ताच्या तक्रारीनंतर चंदननगर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, वडिलांच्या वक्तव्यात तफावत दिसून आल्याने पोलिसांनी संशय घेत त्यांना कसून चौकशीसाठी ताब्यात घेतले.हिम्मत माधव टीकेटी (वय ३.५ वर्षे) असे मृत मुलाचे नाव आहे. चौकशीदरम्यान मुलाच्या वडिलांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पती-पत्नीच्या वारंवार होणाऱ्या भांडणातून रागाच्या भरात त्यांनीच मुलाला संपवले आणि नंतर त्याच्या बेपत्ताची बतावणी केली.
दरम्यान,पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिस अधिक तपास करत असून, आरोपी वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.