शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ईद साजरी करून नुकताच गेला कर्तव्यावर, विमान अपघातात पुण्याचा क्रू मेंबर इरफानचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:51 IST

अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईद साठी घरी येऊन पुन्हा कर्तव्यावर गेला होता

पुणे : अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमानअपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादचे पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी ही माहिती दिली आहे. विमानामध्ये एकूण २४२ जण प्रवास करत होते, त्यापैकी एक ब्रिटीश नागरिक चमत्कारीकरित्या बचावला आहे. देसाई यांनी सांगितलेला आकडा हा विमानातील प्रवाशांपेक्षाही खूप जास्त आहे. यामुळे यात बीजे मेडिकल कॉलेजच्या इंटर्न डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. 

या घटनेत १२ क्रू मेंबर्स होते. तर महाराष्ट्रातील ९ प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच अहमदाबाद मध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या २२ वर्षीय क्रू मेंबरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वेदनादायक बातमी समोर आली आहे. ईद साजरी करून नुकताच इरफान कर्तव्यावर गेला असताना काळाने घाला घातला आणि त्याचा अंत झाला. या घटनेने इरफानच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

कालच गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. २४२ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांमध्ये लहान मुलापासून ते ज्येष्ठापर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. पुण्यातील इरफान शेख हा तरुणही क्यू मेंबर म्हणून कर्तव्यावर गेला होता. पण त्याचा अवघ्या २२ व्या वर्षी दुर्दैवी अंत झाला. इरफान हा पिंपरी चिंचवड च्या संत तुकाराम नगर मध्ये राहायला होता. आजी आजोबा आई वडील भाऊ अस कुटुंब असलेला इरफान दोन वर्षापासून एअर इंडिया मध्ये कामाला लागला होता. अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईद साठी घरी येऊन पुन्हा कामाला गेला होता. त्याच्या जाण्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. त्याचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा अशी मागणी त्याचे नातेवाईक करत आहेत.

असा झाला  अपघात 

विमान समुद्रसपाटीपासून ६२५ फूट उंचीवर गेल्यावर इंजिन बंद पडले आणि विमान खाली कोसळले. विमानतळावरून उड्डाण केल्याने विमानतळाची हद्द ओलांडून विमान पुढे गेले होते. रहिवाशी भागात असलेल्या बीजे मेडिकल क़ॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर हे विमान आदळले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातDeathमृत्यूGujaratगुजरात