शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचा 'आदेश' झुगारला, पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्याने कोरोना लस टोचली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 18:46 IST

सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही लस देण्यास मनाई केली असताना सभापतींना लस मिळाली कशी असा सवाल आता विचारला जातो आहे...

प्राची कुलकर्णी -

पुणे : पंतप्रधाननरेंद्र मोदींनी राजकारण्यांनी लसीकरण करुन घेण्याची गडबड करु नये तसेच आपल्या पदाचा फायदा घेऊ नये हे स्पष्ट केलेले असतानाच शासनाचा आदेश डावलून थेट पंचायत समितीच्या सभापतींनीच लसीकरण करुन घेण्याचा प्रकार पुण्यात उघडकीला आला आहे. महत्वाचे म्हणजे यांनी चक्क नोंदणी करुन ही लस मिळवली आहे. 

वेल्हा पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले यांनी लस घेण्याचा मान पटकावला आहे. पंचायत समिती मधील सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण संपल्याने आपल्यासह आणखी चारपाच जणांचे लसीकरण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही लस देण्यास मनाई केली असताना सभापतींना लस मिळाली कशी असा सवाल आता विचारला जातो आहे. याप्रकरणी आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून संबंधितांना शो काॅज नोटिस बजावण्यात आली आहे. 

सरकारतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यासाठी सरकार कडून एक प्लॅन तयार करण्यात आल्या आहेत. यात सुरुवातीला आरोग्य कर्मचारी- फ्रंटलाईन वर्कस तर त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होणार आहे. 

पण गंमत म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होण्यापूर्वीच वेल्ह्यातल्या पंचायत समितीच्या सभापतींनी आपले लसीकरण करुन घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे या लसीकरणाचे त्यांनी फोटोसेशनही करुन घेतले आहे. याबाबत त्यांना विचारले असतां सरपाले म्हणाले “ आठ दिवसांपूर्वी पंचायत समिती मध्ये माझ्या कडून कागद पत्रे मागवण्यात आली होती. त्यानंतर मला एसएमएस आला. आणि मग माझे लसीकरण करण्यात आले. मी एकट्याने नाही तर माझ्या सोबत आणखी तीन चार जणांचेही लसीकरण झाले आहे.” 

पण ही लस मिळाली कशी हे विचारले असता सरपाले म्हणाले” आमच्या कडच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण संपले होते. त्यामुळे आमचे लसीकरण करण्यात आले. रितसर नोंदणी करुन हे लसीकरण केले आहे. मी सभापती असल्याने हे लसीकरण करण्यात आले आहे” 

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, या प्रकरणी मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडुन अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल.”

 

टॅग्स :Puneपुणेprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसPoliticsराजकारण