शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेकडून पाणी मीटर उत्पादक कंपनीला " डच्चू " देण्याचा विचार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 12:15 IST

महापालिकेच्या महत्वाकांक्षी २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी बसविण्यात येणारे पाणी मीटरची उत्पादक कंपनी बदलण्याचा विचार सुरु झाला आहे.

ठळक मुद्देचुकीच्या पद्धतीने बसविले मीटर : जीपीएस यंत्रणेद्वारे मीटरचे रिडींग घेता येत नसल्याचे कारणधिम्या गतीने सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने करणे आवश्यकआतापर्यंत १५० किलोमीटरचे काम होणे अपेक्षित परंतू, प्रत्यक्षात २० किमी चेच काम पूर्ण

पुणे : महापालिकेच्या महत्वाकांक्षी २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी बसविण्यात येणारे पाणी मीटरची उत्पादक कंपनी बदलण्याचा विचार सुरु झाला आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे मीटरचे रिडींग घेता येत नसल्याचे कारण यासाठी समोर आले आहे. गेल्याच महिन्यात ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने मीटर बसविल्याची तक्रार कंपनीने केली होती.महापालिकेचे मोठे प्रकल्प आचारसंहितेमुळे थंडावले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या प्रकल्पांना गती देण्यात येईल. त्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये २४ तास पाणी पुरवठा, जायका प्रकल्प, नदी काठ सुधारणा प्रकल्प, एचसीएमटीआर या प्रकल्पांविषयी सविस्तर चर्चा झाली. धिम्या गतीने सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने करणे आवश्यक आहे. आतापर्यंत १५० किलोमीटरचे काम होणे अपेक्षित होते. परंतू, प्रत्यक्षात २० किलोमीटरचेच काम पूर्णत्वास गेले आहे. कामाची ही गती राहिल्यास प्रकल्प लांबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढविणे आवश्यक असल्याची चर्चा बैठकीमध्ये झाली. या योजनेनुसार व्यावसायिक व घरगुती पाणी मिटर बसविण्यात येणार आहेत. परंतू, हे मीटर चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आल्याने काही अडचणी निर्माण झाल्याचे सांगत राजकीय पदाधिकारी मीटर उत्पादक कंपनी बदलण्याची मागणी करीत आहेत. तर प्रशासनाने योजनेच्या या टप्प्यावर कंपनी बदलणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. ====शहरामधून प्रस्तावित करण्यात आलेल्या एचसीएमटीआर या रस्ते प्रकल्पासाठी प्रशासनाची तयारी सुरु असून या बैठकीमध्ये त्याविषयीही चर्चा करण्यात आली. बँकाकडून घ्यावे लागणारे कर्ज, सरचार्ज अथवा जाहिरातमधून उत्पन्न अशा विविध पर्यांयाचा रस्ते विकासासाठी विचार सुरु आहे. काही दिवसात या प्रकल्पाचे काम सुरु होण्याची शक्यता आहे. यासोबतच बैठकीमध्ये नदीकाठ सुधारणा प्रकल्पाबाबतही चर्चा झाली असून जलसंपदा विभागाची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका