शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे बाजारांचा उठणार ‘बाजार’ : महापालिका करणार कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 21:06 IST

शहरात सुरु असलेल्या विनापरवाना आणि अनधिकृत आठवडे बाजारांवर महापालिकेकडून कारवाई करणार

ठळक मुद्देराज्य कृषी महामंडळाच्या परवानगीने आठवडे बाजाराचे आयोजन

पुणे : शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळावी तसेच थेट ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळावा याकरिता सुरु केलेल्या आठवडे बाजाराचाच ‘बाजार’ उठण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शहरात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या विनापरवाना आणि अनधिकृत आठवडे बाजारांवर महापालिकेकडून कारवाई करणार आहे. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरे आणि पेठांमध्येही जागोजाग आठवडे बाजार भरविले जात आहेत. या आठवडी बाजारामध्ये ठेवण्यात येत असलेल्या भाजीपाल्यासह शेतमालाला ग्राहकांकडून प्रतिसादही दिला जातो. वाढत्या प्रतिसादामुळे आठवडी बाजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. महापालिकेच्या मिळकतींसह रस्त्यावरही विनापरवाना हे बाजार भरु लागले आहेत. हे बाजार त्वरीत बंद करण्यात यावेत अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. राज्य कृषी महामंडळाच्या परवानगीने आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात येते. मंडळाने नुकतेच महापालिकेला यासंदर्भात पत्र पाठविले असून पालिकेच्या मिळकती आणि रस्त्यांवर सुरु असलेल्या अनधिकृत आठवडे बाजारांना परवानगी दिलेली नसल्याचे कळविले आहे. यासोबतच या अनधिकृत आठवडे बाजारांवर कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे पत्रामध्ये नमूद केले आहे. या पत्राच्या अनुषंगाने पालिकेने या आठवडी बाजारांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या मिळकतींसह रस्त्यांवर भरणाऱ्या अनधिकृत आठवडे बाजारांमुळे होणारी वाहतूक कोंडी, बाजाराच्या ठिकाणी होणारी अस्वच्छता, कचरा न उचलणे असे प्रकार घडतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेकडे अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ज्या आठवडे बाजारांना परवानगी दिलेली नाही अशा बाजारांवर कारवाई केली जाणार आहे. रितसर परवानगी घेऊन तसेच योग्य नियोजन केलेल्या आठवडे बाजारांबाबत पालिकाच नियोजन करणार आहे. अनधिकृत बाजारांवर येत्या सात दिवसात कारवाई सुरु करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.=======कारवाई होणार का ?शहरात बहुतांश ठिकाणी आयोजित केल्या जाणाºया आठवडे बाजारांना राजकीय वरदहस्त असल्याचे चित्र आहे. विविध राजकीय पक्ष अथवा लोकप्रतिनिधींकडूनच या बाजाराचे आयोजन केले जाते. त्यासाठी महापालिकेच्या मोकळ्या जागांसह काही ठिकाणी शाळांच्या मैदानांचाही वापर केला जात आहे. अशा राजकीय वरदहस्त लाभलेल्या आठवडे बाजारांवर कारवाई होणार का असा प्रश्न आहे.  

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका