शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

११ जुलै : अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा; २८ ऑगस्ट : अधिकाऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 12:27 IST

महापालिकेचे चमत्कारिक मतपरिवर्तन..

ठळक मुद्देकोंढवा येथे जून महिन्यात सीमािभंत बांधकाम मजुरांच्या घरावर कोसळून २१ जण मृत्युमुखी

पुणे : प्रशासनाच्या निषकाळजीपणामुळे शहरामध्ये राजरोस लोकांचे बळी जात असून, केवळ  बांधकाम व्यावसायिक, स्ट्रक्चरल अभियंता आणि आर्किटेक्ट यांच्यावर कारवाई न करत महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवरदेखील कडक कारवाई करण्याची मागणी ११ जुलै रोजी झालेल्या मुख्य सभेत करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये महापालिकेचे अधिकारीदेखील दोषी असल्याचे आढळून आल्याने दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु पोलिसांकडून सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असून, पोलीस प्रशासनावर जोरदार टीका करत तातडीने गुन्हे मागे घेण्याची मागणी करत बुधवारी (दि. २८) मुख्य सभा तहकूब करण्यात आली.कोंढवा येथील इमारतीची सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महापािलकेच्या दोन अभियंत्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी पालिका अभियंता संघाने बुधवारी काळ्याफिती लावून काम बंद आंदोलन केले. त्यामुळे पालिकेचे कामकाज ठप्प झाले. त्याचे पडसाद महापालिकेच्या मुख्य सभेत उमटले. मात्र, अभियंत्यावरील गुन्हा मागे घ्या, अशीच थेट मागणी मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कोंढवा येथे जून महिन्यात सीमािभंत बांधकाम मजुरांच्या घरावर कोसळून २१ जण मृत्युमुखी पडले होते. या दुर्घटनेप्रकरणी चौकशी करून कोंढवा पोलिसांनी महापालिकेच्या दोन अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याचे पडसाद महापालिकेत उमटले. अभियंता संघ आणि इतर कर्मचारी संघटनांनी बुधवारी महापािलकेच्या कामकाजात सहभाग घेतला नाही. काम बंद आंदोलन करून त्यांनी निषेध व्यक्त केला.दरम्यान, ही दुर्घटना झाल्यानंतर ११ जुलै रोजी झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत विरोधकासह सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीदेखील दुघर्टनेला महापालिकेचे अधिकारीदेखील जबाबदर असून, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली होती. बांधकाम परवानगी देताना, शहरामध्ये अनधिकृत बांधकामे उभी राहताना महापालिका प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच लोकांचे बळी जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. यामुळे केवळ बांधकाम व्यावासायिक, स्ट्रक्चरल अभियंता आणि आर्किटेक्ट यांच्यावर कारवाई न करता महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याची मागणी करत विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. .......महापालिकेत पोलिसांचा वापरबुधवारी झालेल्या सभेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र शब्दांत पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला. अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी आयुक्तांची परवानगी घेतली होती का, महापािलकेकडे अभियंत्यांची संख्या कमी आहे, त्यांच्यावर कामाचा ताण पडतो आहे, अशा प्रकारे गुन्हे दाखल होऊ लागले तर अभियंते कामच करणार नाहीत नोकरी सोडून देतील, पोलीस महापािलकेच्या अधिकारावर आक्रमण करीत आहेत, असे विविध मुद्दे नगरसेवकांनी मांडले. केंद्र सरकार विरोधकांच्याविरोधात ईडीचा वापर करीत आहे, राज्य सरकार आयकर विभागाचा वापर करीत आहे, तर पुणे महापालिकेत पोलिसांचा वापर करून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. 

पोलीस आयुक्त, मुख्यमंत्र्यांकडे मागणी करूमहापालिकेतील सर्व सत्ताधारी व विरोधकांसह संपूर्ण सभागृह अधिकारी-कर्मचाºयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असा विश्वास देत महापौर मुक्ता टिळक यांनी या प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकत्र जाऊन गुन्हे मागे घेण्यासाठी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊ. तसेच या प्रकरणामध्ये थेट मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना लक्ष घालण्यास सांगण्यात येईल, असेदेखील आश्वासन टिळक यांनी सभागृहामध्ये दिले.  ......

इमारत निरीक्षक व उप-अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाइमारत निरीक्षक व उप-अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलापुणे : कोंढवा येथील एल्कॉन स्टायलस सोसायटीची सीमाभिंत बांधकाम मजुरांच्या वसाहतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी, महापालिकेच्या इमारत निरीक्षक व उप-अभियंत्याने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. इमारत निरीक्षक गिरीश मनोहर लोंढे (वय ३७, रा. भवानी पेठ) व प्रभारी उप-अभियंता कैलास बाजीराव काराळे (वय ५०, रा. गोखलेनगर) अशी या दोघांची नावे आहेत़ या दुर्घटनाग्रस्त भिंतीचे डिझाईन मनपाकडे सादर केले नसल्याचे तपासातून समोर आले.  या संबंधित इमारतीच्या सीमाभिंतीच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीकडे दुर्लक्ष का केले. तसेच याबाबत काही कागदपत्रे जमा करायची असल्याने त्यांची पोलीस कोठडी घेणे गरजेचे आहे, अशी मागणी पोलीस व सरकारी वकिलांनी केली होती. ती ग्राह्य धरून न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

 

टॅग्स :PuneपुणेKondhvaकोंढवाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी