Pune Corona virus News: 6,679 people infected with new corona in Pune city on Sunday, while 2,409 in Pimpri | Pune Corona virus News: पुणे शहरात रविवारी ६ हजार ६७९, तर पिंपरीत २ हजार ४०९ जण नवे कोरोनाबाधित

Pune Corona virus News: पुणे शहरात रविवारी ६ हजार ६७९, तर पिंपरीत २ हजार ४०९ जण नवे कोरोनाबाधित

ठळक मुद्देगंभीर रुग्णांची संख्या हजारांच्या घरात

पुणे: शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा रविवारी सहा हजारांच्या पुढे गेला असून, आज केलेल्या २४ हजार ७७३ तपासणीमध्ये ६ हजार ६७९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात आज दिवसभरात तब्बल ४८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १० जण हे शहराबाहेरील आहेत़. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ९५६ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर १०४५ रूग्ण हे गंभीर आहेत. आज दिवसभरत ४ हजार ६२८ जण कोरोनमुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा ५७ हजार ४७६ इतका झाला आहे. शहरात आजपर्यंत १७ लाख २१ हजार ७१४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख २९  हजार ६६१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ७१ हजार ४३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ७४८ झाली आहे. 

पिंपरी चिंचवडमध्ये आज दिवसभरात २ हजार ४०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात तब्बल ३० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ११ जण हे शहराबाहेरील आहेत़. शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा २५ हजार ४७४ इतका झाला आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pune Corona virus News: 6,679 people infected with new corona in Pune city on Sunday, while 2,409 in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.