Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर गुरुवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 21:13 IST2021-07-28T21:12:54+5:302021-07-28T21:13:20+5:30
लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार

Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर गुरुवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध
पुणे : शहरातील महापालिकेच्या १८६ केंद्रांवर आज ( गुरुवार दि. २९ जुलै) कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना २० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर २० टक्के लस ही 'ऑन दी स्पॉट' नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे.
कोव्हिशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ( ५ मे पूर्वी लस घेतलेल्यांना) आॅनलाईन बुकिंगव्दारे तर ३० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. तसेच सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास ऑन स्पॉट नोंदणी करून उपलब्ध लस नागरिकांना देण्यात यावी अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या आहेत़
--------------------
सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस
शहरातील ससून हॉस्पिटलसह महापालिकेच्या प्रत्येक झोन निहाय पाच ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार असून, ऑनलाईन बुकिंगव्दारे २० टक्के लस ही १८ वर्षांपुढील नागरिकांना व २० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी केलेल्यांना पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़