शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

पुणे कोरोना 'हॉटस्पॉट', तरी विमान प्रवाशांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 12:05 PM

ऑगस्टमध्ये १६८४ विमानांमधून सुमारे दीड लाख प्रवाशांनी ये-जा केली. त्यामध्ये येणारे प्रवासी सुमारे ८० हजार एवढे होते.

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यात १९ तारखेपर्यंत सुमारे ६५ हजार प्रवासी पुण्यात आले

पुणे : मागील काही महिन्यांपासून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असला तरी पुण्यात येणाऱ्यांचा ओघ कमी झालेला नाही. विमानाने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या जाणाऱ्यांच्या तुलनेत अधिक आहे. जुलै महिन्यांपर्यंत हे चित्र अगदी उलट होते. या महिन्यात सुमारे १ लाख १० हजार प्रवाशांपैकी जाणारे प्रवासी सुमारे ६७ हजार एवढे होते. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हे आकडे उलटे झाले आहेत. विशेष म्हणजे ऑगस्टपासून रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे.लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली विमानसेवा २५ मेपासून काही प्रमाणात पुन्हा सुरू झाली. सुरूवातीला विमान व प्रवासी संख्या अत्यंत मर्यादीत होती. पुणे विमानतळावरून मे महिन्यात दररोज सुमारे ३० याप्रमाणे विमानांची ये-जा सुरू होती. जुुन महिन्यात हा आकडा जवळपास ४५ पर्यंत पोहचला. तर जुलैपासून दररोज ५० ते ६० विमानांची ये-जा सुरू आहे. तसेच प्रवासी संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. पुण्यामध्ये जुलै महिन्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढतोय. त्यानंतर परराज्यातील पुण्यात येणाऱ्या विमान प्रवाशांची संख्याही वाढत चालली आहे. जुलै महिन्यात एकुण १ लाख १० हजार प्रवाशांनी विमानाने ये-जा केली. त्यामध्ये सुमारे ६५ हजार प्रवासी येणार होते. तर जाणाऱ्यांची संख्या जवळपास ६७ हजार एवढी होती. पण ऑगस्ट महिन्यापासून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.ऑगस्टमध्ये १६८४ विमानांमधून सुमारे दीड लाख प्रवाशांनी ये-जा केली. त्यामध्ये येणारे प्रवासी सुमारे ८० हजार एवढे होते. तर सप्टेंबर महिन्यात १९ तारखेपर्यंत सुमारे १ लाख १८ हजार प्रवाशांपैकी सुमारे ६५ हजार प्रवासी पुण्यात आले आहेत. महिनाअखेरपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.------------------मागील वर्षीच्या तुलनेत २० टक्केच प्रवासीकोरोना महामारीमुळे सध्या विमान वाहतुकीवर बंधने आहेत. त्यामुळे केवळ प्रमुख शहरांमध्येच विमानसेवा सुरू आहे. परिणामी दरवर्षीच्या सध्या १५ ते २० टक्के प्रवाशांची ये-जा होत आहे. तर विमानांची संख्याही ३० ते ३५ टक्क्यांदरम्यान आहे. दिल्ली, कोलकाता, हैद्राबाद, अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, नागपुर आदी प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा सुरू आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात सुमारे ७ लाख २० हजार प्रवाशांनी पुण्यात ये-जा केली होती.------------मागील तीन महिन्यांतील ये-जा करणारे प्रवासीमहिना            येणारे            जाणारेजुलै              ४३,२७७           ६६,७०१ऑगस्ट         ७९,४१५           ७०,१७३सप्टेंबर         ६४,७०५           ५३,३८८(दि. १९ पर्यंत)-------------------------------------एप्रिल ते ऑगस्टपर्यंतची विमान व प्रवासी संख्यामहिना     विमानांची            ये-जा प्रवासीएप्रिल           ६                       १३०मे              २०४                    १७,२९५जुन           १३९१                 १,१७,५५०जुलै          १४४०                  १,०९,९७८ऑगस्ट      १६८४                  १,४९,५८८

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याpune airportपुणे विमानतळpassengerप्रवासी