राज्यात पुणे सर्वात थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST2021-01-13T04:28:32+5:302021-01-13T04:28:32+5:30
पुणे : पावसाचे मळभ दूर झाल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा गारवा वाढू लागला आहे. असे असले तरी अजूनही पूर्वेकडून ...

राज्यात पुणे सर्वात थंड
पुणे : पावसाचे मळभ दूर झाल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा गारवा वाढू लागला आहे. असे असले तरी अजूनही पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर कायम असल्याने राज्यात सर्वत्र ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. राज्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
मध्य महाराष्ट्राच्या बर्याच भागात, विदर्भाच्या काही भागात तर कोकण, गोव्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. पुण्यात राज्यातील सर्वात कमी किमान तापमान १६.३ अंश सेल्सिअस असले तरी ते सरासरीच्या तुलनेत ५.३ अंश सेल्सिअसने अधिक आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल व किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. राज्यात पुढील चार दिवस हवामान काेरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ४ दिवसात किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता असून ते सरासरीच्या जवळपास पोहचण्याची शक्यता आहे.