शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकर गारठले! निचांकी तापमानाची नोंद; एनडीए, हवेली ८ तर शिवाजीनगर ९ अंशावर

By श्रीकिशन काळे | Updated: January 24, 2024 09:51 IST

तापमानाचा पारा घसरला असल्याने महाराष्ट्रामध्ये देखील हुडहुडी भरली

पुणे : राज्यातील किमान तापमानात मोठी घट झाली असून, कडाक्याची थंडी पडली आहे. पुण्यात देखील यंदाच्या हंगामातील सर्वात निचांकी किमान तापमान बुधवारी नोंदवले गेले. शिवाजीनगर येथे किमान तापमान ९.७ नोंदले असून इतर ठिकाणी देखील असेच तापमान आहे. त्यामुळे पुणेकर आज चांगलेच गारठले आहेत. 

यंदा पहिल्यांदाच शिवाजीनगरचे तापमान ९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. त्यानंतर एनडीए आणि हवेली येथे तर ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज पहाटेपासूनच हवेत खूप गारठा जाणवत होता. सध्या राज्यामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरणाचा अनुभव येत आहे. तसेच राज्यामधील बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. तापमानाचा पारा घसरला असल्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील हुडहुडी भरली आहे. जळगाव, धुळे येथे पारा १० अंशांच्याही खाली गेला आहे. आज बुधवारी (दि.२४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.  देशाच्या उत्तर भारतामध्ये सतत थंडीत चढ-उतार पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे तर मंगळवारी नीचांकी १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच उत्तर प्रदेशात किमान तापमान ३ ते ५ अंशांदरम्यान नोंदले गेले आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही ६ ते १० अंशांच्या दरम्यान तापमान आहे. सध्या उत्तर भारतामध्ये पहाटे धुके, थंडीची लाट, गारठा वाढला आहे.

शहरातील किमान तापमान

एनडीए : ८.२ हवेली : ८.७ शिवाजीनगर: ९.७ पाषाण : १०.१ हडपसर : १२.८ कोरेगाव पार्क: १४.४मगरपट्टा: १६.८

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानenvironmentपर्यावरणSocialसामाजिकHealthआरोग्य