शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

पुणे शहरातील कचराप्रश्न अजून अधांतरीच; प्रलंबित प्रश्न, विकासकामे मार्गी लावल्यानंतरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 11:44 IST

पुण्यात निर्माण झालेली कचराकोंडीची समस्या सुटण्याची नाव घेत नाहीये..

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरुळी आणि फुरसुंगी ग्रामस्थांची बैठक ; तोडगा निघाला नाही

पुणे : कचरा डेपो बंद करण्याविषयी उरुळी आणि फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी आंदोलन पुकारल्यामुळे निर्माण झालेली कचराकोंडी फुटण्याचे नाव घेत नाही. त्यातच शहरात नऊ रुग्ण आढळल्याने या समस्येकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाऊ लागले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ग्रामस्थांसह प्रशासनाची बैठक घेतली. ती सकारात्मक झाली असली, तरी अद्याप तोडगा निघालेला नाही. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आणि विकासकामे मार्गी लावल्यानंतरच निर्णय घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांच्यासह स्थानिक नगरसेवक, रणजित रासकर, किशोर पोकळे, संजय हरपळे, बाळासाहेब हरपळे, विशाल हरपळे, विशाल भाडळे, कचरा डेपो संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. बायोमायनिंग प्रकल्प, कचरा प्रक्रिया प्रकल्प, प्रलंबित विकासकामांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. कचरा डेपोवर टाकणारा कचरा बंद करा, नवीन प्रकल्प सुरू करू नका, बाधित शेतकऱ्यांच्या ५७ कुटुंबांपैकी राहिलेल्या १४ जणांना शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. २००९ पासून सुरू असलेल्या आंदोलनामधून काही साध्य झाले नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी करतानाच ग्रामपंचायतीचाच मिळकत कर ठेवावा, अशा मागण्या आहेत...........कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरुळी आणि फुरसुंगी ग्रामस्थांची बैठक घेतली. विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांबाबत ग्रामस्थ आग्रही आहेत. आम्ही त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले असून त्यांच्या प्रश्नांविषयी कृती आराखडा तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा बैठका घेऊन निर्णय घेतले जातील. सकारात्मक चर्चा झाली असून मार्ग निघेल. - मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे ...................अंमलबजावणीचे दिले आश्वासन आंदोलन मागे घेण्याची महापौरांची विनंती ग्रामस्थांनी अमान्य केली. पालिकेने लेखी पत्र देऊन त्यांची सर्व कामे करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी मुदतीची मागणी केली आहे. विकासकामांसह कचरा डेपोसंदर्भात कृती आराखडा करून त्यावर अंमलबजावणीचे आश्वासन देणारे पत्र दिले आहे. या पत्रावर चर्चा करून शुक्रवारी निर्णय कळवू, असे ग्रामस्थांनी सांगितले..........

टॅग्स :Puneपुणेfursungi garbage depotफुरसुंगी कचरा डेपोfursungi agitationफुरसुंगी आंदोलनMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न