शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहराचे अग्निशामक दल ‘यंत्र सामुग्रीने सुसज्ज पण मनुष्यबळात उणे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 22:25 IST

पुणे शहरातील नागरिकांचे विविध आपत्ती आणि संकटामधून रक्षण करणारे जवान संकटात आहेत.

ठळक मुद्देकेंद्रांची कमतरता : शासन दरबारी पदांची भरती प्रलंबित

पुणे : आग असो की पूर... भिंत पडो की इमारत... झाड कोसळो की डोंगर... सर्व ठिकाणी आपत्तीच्या काळात धावून जाणा-या अग्निशामक दलाच्या जवानांवर कामाचा ताण वाढला आहे. पुण्याची हद्द आणि लोकसंख्या गेल्या २० वर्षात ज्या प्रमाणात वाढली त्या प्रमाणात मात्र अग्निशामक दलाचे मनुष्यबळ आणि अग्निशामक केंद्रांची संख्या मात्र वाढलेली नाही. साधनसामुग्रीने सुसज्ज असलेले पुण्याचे अग्निशामक दलात मनुष्यबळाची मात्र वाणवा आहे.

शहरातील नागरिकांचे विविध आपत्ती आणि संकटामधून रक्षण करणारे जवान संकटात आहेत. दलाच्या जवळपास ५१० जागा रिक्त आहेत. यामध्ये ‘फायरमन’च्याच ३९० जागा आहेत. चालकांचीही कमतरता असून ऐनवेळेला पालिकेच्या व्हेईकल डेपोकडून कंत्राटी चालक अग्निशामक दलाला मागवावे लागतात. ‘फायर इंजिन’ चालविण्यात हे चालक वाकबगार नसल्याने अनेकदा अडचणी उद्भवतात. दलाच्या मदतीकरिता देण्यात आलेल्या देवदूतच्या गाड्याही कंत्राटी असून त्यावरील मनुष्यबळही कंत्राटी आहे. यासोबतच अलिकडच्या काळात मदतनीस चार-चार महिन्यांच्या मुदतीवर कंत्राटी पद्धतीने घेतले जात आहेत. परंतु, हा उपाय तात्कालीक ठरत असून यामुळे दलाच्या जवानांवरील ताण कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे.===१) शहरात एकूण १४ अग्निशामक केंद्र असून आणखी १२ केंद्रांची आवश्यकता आहे.  गंगाधाम चौक, काळेपडळ आणि धानोरी येथील केंद्र बांधून तयार आहेत. तर, नाना पेठ, टिंगरेनगर, वडगाव बुद्रुक (सिंहगड रस्ता), न-हे येथेही केंद्रांसाठी जागा ताब्यात आहेत.२. अग्निशामक दलाकडे आजमितीस ५१० पदे रिक्त असून ही पदे तात्काळ भरली जाणे आवश्यक आहे.====अग्निशामक दलाकडे आधुनिक साधन सामुग्री उपलब्ध आहे. लांब शिडीच्या आणि अत्याधुनिक ब्रँटो सारख्या वाहनांमुळे दलाची क्षमता वाढली आहे. पुरेसे टँकर, छोट्या-मोठ्या गाड्या, बंब, कर्मचा-यांसाठी सुरक्षा साधने, गणवेश, बूट, हातमोजे, हेल्मेट आदी साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. पालिकेने त्यावर कोट्यवधींचा खर्च केला. परंतु, त्याप्रमाणात मनुष्यबळ मात्र नाही.====चालू वर्षात पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात किरकोळ आणि गंभीर स्वरुपाच्या आग लागण्याच्या तसेच झाडपडी, घरपडी, भिंतपडी, पूर आदी विविध प्रकारच्या ७५० घटना अग्निशामक दलाकडे नोंदविण्यात आल्या आहेत.  या घटनांची माहिती मिळताच दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत नागरिकांची मदत केली.====२०१४ साली महापालिकेच्या विविध विभागांच्या पदांचे रोस्टर तयार झाले. शासनाने संपुर्ण राज्यातील अग्निशामक दलाची पदे वगळून सर्व पदांना मान्यता दिली. दलाच्या पदांसाठी आवश्यक शिक्षण व पदोन्नतीबाबत पॉलिसी ठरविण्यात येणार होती. शासनदरबारी हे रोस्टर प्रलंबित असल्याने नवीन भरती करता येत नाही. तसेच, पदोन्नतीही देता येत नाही. आजमितीस शहरात तीन केंद्र बांधून तयार आहेत. परंतु, मनुष्यबळ नसल्याने ते सुरु करता येत नाहीत.- प्रशांत रणपिसे, प्रमुख, अग्निशामक दल

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दलfireआगfloodपूरState Governmentराज्य सरकार