शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील 'या' शैक्षणिक संस्थेमध्ये कोरोनाचा शिरकाव; १३ विद्यार्थ्यांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 15:43 IST

परिणामी पुढील काळात ऑफलाईन वर्ग व परीक्षांबाबत कोरोना विषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे.

राहुल शिंदे 

पुणे : कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील मॅकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षातील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी पुढील काळात ऑफलाईन वर्ग व परीक्षांबाबत कोरोना विषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे.

 विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक संस्थांकडून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन वर्गांसाठी प्रवेश दिला जात आहे.एमआयटीमधील विद्यार्थ्यांना कोरोना विषयक नियमांचे पालन करूनच प्रवेश देण्यात आला होता. तरीही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे.

 एमआयटी विद्यापीठाचे कुलसचिव प्रशांत दवे म्हणाले, एमआयटीमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. दोन-तीन दिवसांपूर्वी कोरोना बाधित अढळून आलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील सुप्रा स्पर्धेची तयारी करत होते. त्यांना विद्यापीठाच्या वर्कशॉपमध्ये स्पर्धेच्या तयारीसाठी प्रवेश दिला होता. एका कोरोना बाधित विद्यार्थ्याच्या संपर्कात 25 विद्यार्थी आले होते. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहेत. आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून चार विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यात एकही विद्यार्थी ओमायक्रॉनचा नाही.      विद्यापीठाच्या एका कोप-यात वर्कशॉपमध्ये विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा इतरांशी संपर्क आलेला नाही. तसेच एमआयटी प्रशासनाकडून कोरोना विषयक काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच कोरोना बाधित विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिणामी यामुळे पूर्ण कॅम्पस बंद करण्याचे कारण सध्या तरी समोर दिसत नाही.शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करूनच कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.विद्यापीठाकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे.

टॅग्स :kothrudकोथरूडcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय