शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ८८७ जणांची कोरोनावर मात, तर ४८६ कोरोनाबाधितांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 19:26 IST

शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ६ हजार ६१५, त्यापैकी १ हजार ६२३ जणांवर विविध रुग्णालयात ऑक्सिजनसह उपचार सुरू

ठळक मुद्देशहरातील गंभीर रूग्ण संख्या ९५४ इतकी असून आज ३७ रुग्णांनी जीव गमावला आहे.

पुणे: शहरात रविवारी कोरोनाबाधितांची वाढ ही पुन्हा एकदा पाचशेच्या आत आली असून, आज दिवसभरात केवळ ४८६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  दरम्यान महापालिकेसह खाजगी प्रयोगशाळांमधील तपासण्यांचे प्रमाणही दिवसागणिक कमी होऊ लागले असून, आज झालेल्या ७ हजार ४२३ तपासण्यांमध्ये एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारीही ६.५४ टक्के इतकी खाली आली आहे़ 

शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ६ हजार ६१५ असून, रविवारी ८८७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़. दिवसभरात ३७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहे़ शहरातील आजचा मृत्यू दर हा १.७५ टक्के इतका आहे़.  

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये १ हजार ६२३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ९५४ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २४ लाख ९२ हजार २९८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६९ हजार ७४७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  तर यापैकी ४ लाख ५४ हजार ९०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ८ हजार २३२ जणांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसDeathमृत्यूGovernmentसरकार