शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग क्रिकेटपटूला पुणेकरांकडून मदतीचा हात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 17:33 IST

एप्रिल महिन्यात झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या क्रिकेट सामान्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन घरी परतत असताना शैलेंद्रचे संपुर्ण क्रिकेट किट पुणे रेल्वे स्थानकावरील वेटींग रुममधून चोरीला गेले होते.

ठळक मुद्देशैलेंद यादव : निरंजन सेवाभावी संस्थेकडून क्रिकेटचे नवे किट भेट

पुणे : दिव्यांगाच्या भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडू असलेल्या भोपाळमधील क्रिकेटपटूचे क्रिकेटचे संपूर्ण किट पुणे रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी चोरीला गेले. आपले किट चोरीला गेल्याने त्या खेळाडूमध्ये आलेली नकारात्मक भावना दूर करीत नवे किट देऊन पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे केला. संस्थेतर्फे भारतीय व्हिलचेअर क्रिकेट टिममधील दिव्यांग क्रिकेटपटू शैलेंद यादव याला पोलीस आयुक्त कार्यालयात पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या हस्ते क्रिकेट किट भेट देण्यात आले. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, ॠषभ सर्जिकलचे संचालक अनुप गुजर, संस्थेचे अध्यक्ष जगदीश मुंदडा,यादव यांचे सहकारी उपस्थित होते.  के.व्यंकटेशम म्हणाले, यादव हे दिव्यांग असूनही एक उत्तम खेळाडू आहेत. आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यापुढेही क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली कामगिरी करावी, याकरीता  संस्थेने त्यांना मदतीचा हात दिला आहे. क्रिकेटची जी साधना यादव करीत आहेत, त्यात त्यांना यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शैलेंद्र म्हणाला, माझे किट चोरीला गेल्याने मला अत्यंत दु:ख झाले. मात्र,  संस्थेने मला किट दिल्याने मला आनंद झाला आहे. देशासाठी अधिक जोमाने खेळण्याची ताकद यामाध्यमातून मला मिळाली आहे. ===लोहमार्ग पोलिसांची उदासिनता एप्रिल महिन्यात झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या क्रिकेट सामान्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन घरी परतत असताना शैलेंद्रचे संपुर्ण क्रिकेट किट पुणे रेल्वे स्थानकावरील वेटींग रुममधून चोरीला गेले होते. ही घटना 2 एप्रिल रोजी घडली होती. लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी केवळ सामान हरवल्याचा गुन्हा दाखल करुन घेतला. मात्र, चोरीचा गुन्हा दाखल केला नाही. आपले साहित्य मिळेल या आशेने शैलेंद्र काही दिवस पुण्यात राहिला. परंतू, हाती पडलेली निराशा घेऊन तो भोपाळला गेला. ही माहिती समजताच संस्थेच्यावतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला. मूळचा भोपाळचा शैलेंद्र या कार्यक्रमासाठी खास भोपाळहून पुण्यात आला होता. क्रिकेट कीटसह शैलेंद्रच्या प्रवास खर्चाचा भार संस्थेने उचलला आहे. 

टॅग्स :Puneपुणेpune railway stationपुणे रेल्वे स्थानकPoliceपोलिस