शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

अखेर मुहूर्त ठरला! पाच सेकंदांत पुण्याच्या चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 20:29 IST

१ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार

पुणे : चांदणी चौकातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अडथळा ठरत असलेल्या पुलाला पाडण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून २ ऑक्टोबरच्या पहाटे २ वाजता हा पूल तुकड्यांमध्ये पाडला जाणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. यासाठी नियोजन पूर्ण झाले आहे. केवळ ५ सेकंदांमध्ये हा पूल पाडण्यात येणार आहे.

या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी संबंधित यंत्रणांची बैठक झाली. त्यात जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, वाहतूक पोलीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या नियोजनाबाबत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याबाबत देशमुख म्हणाले, “हा पूल पाडण्यापूर्वी येथील सर्व सेवा वाहिन्या स्तलांथरीत करण्यात आल्या आहेत. तसेच पूल पाडल्यानंतर तयार होणाऱ्या वाढीव लेनसाठी सर्व भूसंपादन पूर्ण झाले आहे. जमिनीच्या एका छोट्या तुकड्यासाठी संबंधित जमीन मालक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. हा अपवाद वगळता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुचविलेली सर्व जमीन ताब्यात आली आहे. हा पूल पाडण्यापूर्वी वाहतुकीचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात येणार आहे. पूल पाडण्यासाठी शनिवार हा कमी वाहतुकीचा दिवस निवडण्यात आला आहे. तसेच रात्री वाहतूक तुलनेने कमी असल्याने रात्री वेळ योग्य असल्याचे संबंधित यंत्रणांचे म्हणणे होते. त्यानुसार ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. या काळात वाहतूक पोलिस तसेच पुणे व पिंपरीचे पोलिस उपस्थित राहतील.”

पूल पाडण्यासाठी

- सुमारे ६०० किलो स्फोटकांचा वापर- पुलाला १३०० ठिकाणी दीड मीटर खोलीची छिद्रे- इम्पोलजन किंवा एक्सप्लोजन या पद्धतीने न पाडता त्याचे तुकडे (फ्रॅगमेंटेशन) करून पाडण्यात येणार- केवळ ५ ते ६ सेकंदांत पडणार पूल- त्यानंतर अर्ध्या तासाने जिवंत स्फोटके नाहीत याची खात्री करून राडारोडा उचलणार- ४ डोझेल, ८ पोकलेन, ३० टीप्पर अशी अवाढव्य वाहने- १०० मजूर हा राडारोडा उचलणार- सहा तासांत उचलणार राडारोडा- २०० मीटरच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी केवळ ४ जण थांबणार- त्यात १ स्फोट करणारा, १ प्रकल्प व्यवस्थापक, १ स्फोट डिझायनर व १ पोलीस

२०० मीटर परिसरातील तीन इमारतींना पूर्णपणे मोकळ्या करणार 

पूल पाडल्यानंतर तयार होणाऱ्या धुळीचे लोट उठणार आहेत. तसेच या स्फोटामुळे परिसरातील इमारतींना धोका पोचू शकतो याचा अंदाज घेऊन २०० मीटर परिसरातील तीन इमारतींना पूर्णपणे मोकळे करण्याबाबतची नोटीस देण्यात येणार आहे. या तिन्ही इमारती हॉटेल असून अन्य कोणत्याही रहिवासी इमारती नाहीत. नागरिकांनी या काळात या मार्गाने जाणे टाळावे. केवळ आपत्कालिन परिस्थितीत जात असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा. याबाबत सातारा, कोल्हापूर जिल्हाधिकारी तसेच वाहतूकदारांच्या संघटनेलाही कळविण्यात येणार आहे. डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

वाहतूक नियोजनात बदल 

वाहतूक नियोजनाबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे म्हणाले, “या दिवशी कात्रज चौकापासून हिंजवडी राजीव गांधी पुलापर्यंत सर्व ठिकाणी वाहतूक पोलिस असतील. मुंबईकडून येणारी जडवाहतूक तेळगाव येथील टोल नाक्यावरच थांबविण्यात येणार आहे. तर साताऱ्याकडून येणारी वाहतूक केढ शिवापूर टोल नाक्यावरच थांबवली जाई. मात्र, हलकी वाहने पिंपरी, बाणेर, औंधमार्गे शिवाजीनगर, स्वारगेट कात्रजपासून पुन्हा महामार्गावर वळविण्यात येईल. तर साताऱ्याकडून येणारी हलकी वाहने जुना कात्रज घाट कात्रज चौक, स्वारगेट, टिळक रस्ता, शिवाजीनगरहून औंध किंवा पिंपरीमार्गे मुंबईकडे वळविण्यात येतील.”

''स्फोटके आणण्यासाठी पुण्यातील एका डिलरला कंत्राट देण्यात आले आहे. ही स्फोटके एका व्हेसलमध्ये (बाटली किंवा भरणी) ठेवण्यात येणार आहेत. स्फोटाच्या चार तास आधी ते घटनास्थळी पोचतील. कमीतकमी वेळेत पूल पाडून नागरिकांना याचा कमीत कमी त्रास होईल याची खबरदारी घेतली जाईल. - उत्कर्ष मेहता, इडीफाईस इंजिनियरिंग, कंत्राट दिलेली कंपनी'' 

टॅग्स :Puneपुणेchandni-chowk-pcचांदनी चौकEknath Shindeएकनाथ शिंदेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी