कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कारला अपघात; पुलावरून भुयारी मार्गात कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 12:17 IST2020-12-27T12:17:11+5:302020-12-27T12:17:34+5:30

अपघातात कारचं मोठं नुकसान; सुदैवानं कोणीही जखमी नाही

in pune car crashed from Garware Bridge fells into underground road | कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कारला अपघात; पुलावरून भुयारी मार्गात कोसळली

कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कारला अपघात; पुलावरून भुयारी मार्गात कोसळली

पुणे : मध्यरात्रीच्या सुमारास वेगाने जात असताना अचानक कुत्रे आडवे आल्याने वाहनचालकाचे नियंत्रण सुटून मोटार गरवारे पुलावरुन अर्ध भुयारी
मार्गात कोसळली. या अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ही घटना मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी घडली.

याबाबत डेक्कन पोलिसांनी सांगितले की, मनोज काळगुंदे (वय २४, रा. पाषाण) हे व इतर तिघे जण जंगली महाराज रोडवरील हॉटेलमध्ये जेवायला आले होते. मनोज हे मॅकेनिक आहेत. जेवण झाल्यानंतर परत घरी जात असताना ते गरवारे पुलाजवळ आले. अचानक त्यांच्या मोटारीसमोर कुत्रे आडवे आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार तेथ कठडा तोडून गरवारे अर्ध भुयारी मार्गात कोसळली. मोटारीचा आवाज ऐकून आजू बाजूचे लोक धावत आले. त्यांनी मोटारीतील चौघांना बाहेर काढले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

Web Title: in pune car crashed from Garware Bridge fells into underground road