शहरं
Join us  
Trending Stories
1
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
2
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
3
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
4
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
5
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
6
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
7
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
8
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
9
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
10
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
11
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
12
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
13
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
14
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
15
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
16
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
17
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
18
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
19
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!

Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 23:52 IST

प्रशांत हा मुळचा साेलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातला. आई-वडील शेतकरी. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी हाेण्याचे स्पप्न उराशी बाळगून ताे पुण्यात आला हाेता.

पुणे : राज्य सेवेची पूर्व परीक्षा रविवारी हाेणार हाेती. त्यासाठी आवश्यक प्रवेशपत्राची (हाॅल तिकिट) प्रिंट काढण्यासाठी मी ग्रंथालयातून बाहेर पडलाे. प्रिंट काढून झाल्यानंतर चहा घेऊन अभ्यासाला बसावं या विचाराने टपरीवर गेलाे. चहाचा घाेट घेत असतानाच अचानक भरधाव कारने उडवले अन् सर्वच हरवून बसलाे... हे शब्द आहेत. भरधाव कारच्या धडकेत पायाला गंभीर दुखापत झालेल्या प्रशांत बंडगर याचे. त्याच्यावर सध्या माेडक रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे.

प्रशांत हा मुळचा साेलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातला. आई-वडील शेतकरी. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी हाेण्याचे स्पप्न उराशी बाळगून ताे पुण्यात आला हाेता. तत्पूर्वी त्याने लातूर येथील कृषी महाविद्यालयातून बीएससी ॲग्री पूर्ण केलेला. मागील दाेन वर्षांपासून ज्ञानयोगी अभ्यासिकेत बारा बारा तास अभ्यास करत हाेता. काेणतेही क्लास नाही, की मार्गदर्शन नाही. स्वत:च तयारी करत हाेता आणि या वेळी आपण नक्की पास हाेऊ असा चंग बांधला हाेता.

मात्र, शनिवारी (दि. ३१) सायंकाळी भरधाव कारने उडवले आणि मी परीक्षेला जाण्याऐवजी रुग्णालयात अडकून पडलाे. यातील जखमा पेक्षा परीक्षा हुकणार, याचं अधिक दु:ख हाेत आहे, असेही प्रशांत सांगत हाेता. विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला ताे आवर्जून सांगत हाेता, पेपर बुडणार याची वेदना अधिक हाेत असल्याची हळहळ व्यक्त करीत हाेता.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात