शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Pune Car Accident :गाडीचा मालक अन् चालक यांच्यामधील कराराची कागदपत्रे तपासून गुन्हा दाखल;पोलिस उपायुक्तांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 13:02 IST

- चार तरुणांचे पाय फ्रॅक्चर, युवतीचे कंबरडे मोडले, चालकाला स्थानिकांचा चोप, तीनजण पोलिसांच्या ताब्यात, सात विद्यार्थ्यांची आज परीक्षा 

पुणे : सदाशिव पेठेत शनिवारी (दि. ३१) सायंकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या मद्यधुंद कारचालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या बाराजणांना ठोकरले. शहराच्या भरवस्तीत झालेल्या या भीषण अपघातात चारजणांचे पाय मोडले, तर एका युवतीच्या कमरेला गंभीर दुखापत झाली. अपघातामुळे जखमींपैकी सातजण एमपीएससीची तयारी करणारे असून, त्यांची आज, रविवारी (दि. १) परीक्षा आहे. त्यांना या परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता आहे. या परीक्षार्थींबाबत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली. अपघातानंतर निरनिराळ्या क्लासमधील शेकडो विद्यार्थ्यांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले.

कारचालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी) याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी त्याला व त्याच्या दोघा साथीदारांना बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातात अविनाश दादासाहेब फाळके (२४), प्रथमेश पांडुरंग पतंगे (२५), संदीप सुनील खोपडे (२५), सोनाली सुधाकर घोळवे (२४), मंगेश आत्माराम सुरवसे (२६), अमित अशोक गांधी (२५), समीर श्रीपाद भालचिकर (२५), सोमनाथ केशव मेरूकट (२४), प्रशांत ब्रह्मदेव बंडगर (२६), किशोर हरिभाऊ भापकर (२७), पायल आदेश कुमार दुर्गे (२४), गुलनाझ सिराज अहमद (२४) जबर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघाताचे वृत्त समजल्यावर शेकडो विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला. तातडीने परस्परांच्या मोबाइल फोनवर संपर्क साधल्यानंतर अपघातस्थळी तसेच रुग्णालयांबाहेर शेकडो विद्यार्थी जमले होते. तसेच या घटनेचे वृत्त समजल्यावर पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ एकचे प्रभारी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे व त्यांची पथके घटनास्थळी दाखल झाली.

शहराच्या मध्यवस्तीतील सदाशिव पेठेतील पेरुगेट परिसर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. या परिसरात ऐन रस्त्यावर खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल असल्याने रस्ते कमालीचे चिंचोळे बनले आहेत. या भागातील श्री नाथसाई अमृततुल्य हॉटेलबाहेर अनेक विद्यार्थी शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास चहा पीत उभे होते. हा रस्ता जेमतेम आठ-दहा फूट रुंदीचा आहे. त्यावेळी जंगम महाराज मठाकडून भरधाव वेगाने खासगी प्रवासी टॅक्सी वेगाने आली व ती डाव्या बाजूला अखिल सदाशिव पेठ नवरात्र मंडळाकडे वळाली. मात्र, तेथे मुळात अरुंद असलेला निम्मा रस्ता विद्यार्थ्यांनी व्यापला होता. तेथे कारचालक मुळे याचे नियंत्रण सुटले व ब्रेक दाबण्याऐवजी त्याने अक्सिलेटरवर पाय दिला. त्यामुळे कार भरधाव वेगाने हॉटेलमध्ये घुसली. तिची धडक बसून विद्यार्थी उडून रस्त्यावर पडले.या भीषण अपघाताच्या आवाजाने कार्यकर्त्यांनी व अन्य विद्यार्थ्यांनी तेथे धाव घेतली. जखमींपैकी अनेकांना उभे राहणेही शक्य होत नव्हते. अपघातस्थळाचे चित्र काळजाचा थरकाप उडविणारे होते. स्थानिक मंडळींनी जखमींना मिळेल त्या वाहनांनी नजीकच्या रुग्णालयात हलविले. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पथक तेथे दाखल झाले. दरम्यान, कारचालक मुळे व त्याच्या दोघा साथीदारांना नागरिकांनी बेदम चोप दिला. पोलिसांनी या तिघांना तातडीने पोलिस ठाण्यात नेले. विश्रामबाग पोलिस ठाण्यात अपघातासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी १२ जणांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजूनही दोन ते तीन जण रुग्णालयात आहे. चार ते पाचजणांना फ्रॅक्चर आहे. बाकीचे लोक जखमी आहेत. कारचालकासह सहप्रवासी दोघेही मद्य प्यायले असण्याची शक्यता आहे. चालक, सहप्रवासी आणि गाडीमालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गाडीचा मालक आणि चालक यांच्यामधील कराराची कागदपत्रे तपासून गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  - निखिल पिंगळे, पोलिस उपायुक्त, गुन्हे, प्रभारी परिमंडळ १ 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात