शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

Pune Cantonment Vidhan Sabha Election Result 2024 Live : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा : सुनील कांबळे १०,३२० मतांनी विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 16:22 IST

Pune Cantonment Vidhan Sabha Election Result 2024 Live

Pune Cantonment Vidhan Sabha Election Result 2024 Live  : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे यांनी काँग्रेसचे रमेश बागवे यांचा १०,३२० मतांनी पराभव करून मोठा विजय मिळवला आहे. ७६,०३२ मते मिळवत कांबळे यांनी मतदारसंघावर भाजपचा झेंडा पुन्हा फडकवला आहे. काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे ६५,७१२ मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

अंतिम आकडेवारी

  • सुनील कांबळे (भाजप): ७६,०३२ मते (+१०,३२० आघाडी)
  • रमेश बागवे (काँग्रेस): ६५,७१२ मते

 

भाजपसाठी मोठा विजय२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही कांबळे यांनीच या मतदारसंघातून विजय मिळवला होता. यंदाही मतदारांनी भाजपवर आपला विश्वास कायम ठेवत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. २० व्या फेरीच्या अखेरीस बागवे यांना १०,३२० मतांनी कांबळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

काँग्रेसला फटकाकाँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी स्थानिक मुद्दे उपस्थित करत आणि जोरदार प्रचार करत मतदारसंघात काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपच्या संघटित प्रचारयंत्रणेपुढे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. 

 इथे क्लिक करा >महाराष्ट्र विधानसभा २०२४ 

भाजपचा पुण्यात दबदबासुनील कांबळे यांच्या विजयासह भाजपने पुण्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांवर आपला कब्जा कायम ठेवला आहे. कसबा पेठ, पर्वती, शिवाजीनगर कोथरूड, खडकवासला, आणि पुणे कॅन्टोन्मेंट या सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024BJPभाजपाpune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्डDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस