शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

By नारायण बडगुजर | Updated: June 15, 2025 23:26 IST

Pune Bridge Collapse : कुंडमळा पूल दुर्घटनेत पाच वर्षाच्या बालकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ४७ जण जखमी झाले आहेत.

मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळून झालेल्या गंभीर दुर्घटनेत मृतांचा आकडा रात्री पावणेअकरापर्यंत चारवर पोहोचला आहे. तर, जखमींची संख्या ५१ झाली आहे.

कुंडमळा दुर्घटनेतील मृतांची नावे चंद्रकांत गुनाजी साठले (४५, रा. वानवडी, हडपसर), रोहित सुधीर माने (३१), विहान रोहित माने (५, दोघे रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड), चेतन आण्णाप्पा चावरे (२३, रा. इंद्रायणी काॅलनी, तळेगाव दाभाडे, मूळ रा. नसलापूर, ता. रायबाग, जि. बेळगाव) अशी आहेत.

पाच वर्षाच्या बालकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ४७ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवेने अत्यंत वेगाने आणि कार्यक्षमतेने मदतीसाठी धाव घेतली.

'हे' झालेत जखमीजखमींमध्ये श्रीकांत गरुड, शुभम वाळुंजकर, सुनील कागवाडे, सुमेर कागवाडे, विजय यनकर, कृष्णा गांधी, आर्यन गायसमुद्र, दीपक वीरकर, सिद्धी बोत्रे, ओंकार पेहरे, चंद्रकांत चौगुले, सानवी भाकरे, वर्षा भाकरे, योगेश भंडारे, संजय भोपे, दिव्या भोपे, सिद्धाराम बांदल, समर्थ सिद्धाराम सोलापूरी, शंतनु निगडे, गोपाळ तीवर, वैशाली उपाध्याय, शिल्पा भंडारे, यास्मिन चौधरी, अशोक भेगडे, सुनील कुमार, वैभव उपाध्याय, अंजूम शहा, अमोल घुले, चित्रलेखा गौर, शमिका माने, होराजी आगलावे, इंदोल तावरे, सुरेश पडवळ, मोनाली पडवळ, वेदांती पडवळ, विनीत पडवळ, योगेश पडवळ, रोहन शिंदे प्रथमेश पलालकर, अभिषेक पाटील, शौकत गौर, तेजस देवराय, प्रथमेश देवरे, सौरभ माने, दीपक कांबळे, ओमकार गिरी, प्रकाश काकडे, साहिल शेटे, सलोनी उपाध्याय, लतिका गौड यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

पूल कोसळल्याची माहिती मिळताच १०८ नियंत्रण कक्षाने जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियांक जावळे आणि रोहित ढोमसे यांच्या समन्वयाने तात्काळ ७ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. अरुंद रस्त्यामुळे अडथळे येत असतानाही १०८ कर्मचारी १५–२० मिनिटांत दुर्घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर तळेगाव जनरल हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल, मायमर हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरु आहेत. स्थानिक प्रशासन,  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,  पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशामक डाळ, केंद्रीय राखीव पोलीस दल, आपदा मित्र, पुणे पीएमआरडी अग्निशामक दल,  शिवदुर्ग संघटना,  वन्यजीव संघटना यांच्यातर्फे मदत करण्यात आली.  

घटनास्थळी पाठवण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिकांचे बेस लोकेशन्स:तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र, वडगाव मावळ ग्रामीण रुग्णालय, उर्से टोल प्लाझा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्र, निगडी यमुनानगर प्रसूतिगृह, देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, पवननगर काळे कॉलनी ग्रामीण रुग्णालय आहे. 

१०८ सेवेच्या वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांची कामगिरीडॉ. मशमूम, डॉ. किरण राजपूत, डॉ. स्वप्नील माटकर, डॉ. सुखेंशी हारले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. विजय कदम, रुग्णवाहिका चालक/पायलट: सूर्यकांत, जयदीप माने, रोहित नाईक, अमोल सुरतवाला, श्रीरंग पाडाळे, अनिल आंद्रे या कर्मचाऱ्यांनी दुर्घटनेच्या क्षणीच धैर्याने आणि तत्परतेने रुग्णांवर उपचार करत त्यांचे प्राण वाचवले. प्रशासनाकडून त्यांच्या कार्यक्षमतेचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी चोवीस तास मदत कक्ष सुरूतहसील कार्यालय मावळ येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चोवीस तास मदत कक्ष कार्यरत आहे. नागरिकांनी मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा: हेल्पलाइन क्रमांक: ०२११४–२३५४४०

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातmavalमावळ