शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Baramati :सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:36 IST

ग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे

बारामती - चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ ३ दिवस शिल्लक असून, बारामती परिमंडलामध्ये वीजबिल वसुलीची धडक मोहीम सुरु आहे. ग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी बारामतीसह सातारा व सोलापूर मंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार (दि. २९) व रविवार (दि. ३०) व सोमवार (दि. ३१) या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. या आर्थिक वर्ष अखेरीस रविवारी (दि. ३०) गुढीपाडवा व सोमवारी (दि. ३१) रमजान ईदची सार्वजनिक सुट्टी आली आहे. या सुटीच्या दिवशीही ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात असुन, खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यासाठी ग्राहकांना थकबाकीसह पुनर्जोडणी शुल्क जीएसटीसकट भरावे लागणार आहे. घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांनी www.mahadiscom.in या संकतेस्थळाचा तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपचा वापर करावा. याशिवाय भीम, गुगल पे, फोन पे सारख्या विविध युपीआय ॲपद्वारेही वीजबिल सहज भरता येते. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS किंवा NEFT द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठीचा आवश्यक तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा भरणा वेळेत करुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडelectricityवीज