शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

...तरचं सर्वसामान्यांचं भलं होईल; नाना पाटेकरांचा राजकीय नेत्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 17:51 IST

सोहळ्याला उपस्थित राजकीय नेत्यांना नाना पाटेकरांनी सल्ला दिला आहे

पुणे : शिवजयंतीनिमित्त बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. हा सोहळा अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पुण्यातील खासदार, आमदार आणि इतर राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर यांनी उपस्थित राजकीय नेत्यांना सल्ला दिला आहे. राजकारणातील सर्व चांगली माणसे एकत्र आली तर सर्वसामान्यांचे भले होईल असं त्यांनी सांगितलं आहे.  पाटेकर म्हणाले, राजकारणातील सर्व चांगली माणसे एकत्र आली तर सर्वसामान्यांचे भले होईल. पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात येणाऱ्याला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नये म्हणजे कोणीच पक्ष बदलणार नाही. मृत्यूला तळहातावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जगविले आहे. या आपल्या राजाचा सन्मान करायचा असेल तर तशी वृत्ती बनवा असं ते म्हणाले आहेत.  

शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करा

''छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करणे सोपे आहे. परंतु त्यांच्या विचाराचे अनुकरण करून त्यांच्या विचारसरणीप्रमाणे एक पाऊल जरी पुढे टाकता आले तर स्मारकाचे सार्थक झाले. हेच विचार घेऊन सर्वांना एकत्र करून सर्वांना अभिमान वाटावे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बाणेर तयार केले आहे असे कौतुकही त्यांनी यावेळी केले आहे.''  

प्रेमाने मिठी मारल्यास सर्व द्वेष दूर होतील

''सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना एकत्र करून महाराजांनी स्वराज्य स्थापले, त्यामुळेच त्यावेळी कोणी असमाधानी नव्हता. इतिहासाच्या नावाखाली कोणी विकृती पेरू नये, ज्या दिवशी माणूस म्हणून एकमेकांना आपण ओळखू त्या दिवशी या स्मारकाचा सन्मान झालेला असेल. एकमेकांना प्रेमाने मिठी मारल्यास सर्व द्वेष दूर होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.'' 

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरPoliticsराजकारणSocialसामाजिक