शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १३ कोटी २३ लाखांची मदत

By नितीन चौधरी | Updated: March 20, 2025 16:50 IST

उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मदतीचा निधी पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

पुणे - जिल्ह्यात पावसाळ्यातील जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत फळबागांसह विविध पिकांचे नुकसान झालेल्या २२ हजार २१० शेतकऱ्यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून १३ कोटी २३ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. यातील ११ हजार २९० शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे बँक खात्यात ७ कोटी ६० लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मदतीचा निधी पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.यंदा जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा, भाजीपाला आणि इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून माहिती मागवली होती. त्यानुसार तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीपिकांचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांची यादी तयार करून सरकारला पाठवली. राज्य सरकारने ही यादी डीबीटी संकेतस्थळावर प्रकाशित केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे थेट जमा करण्यात आले.आधार-बँक लिंक आवश्यकनुकसानभरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. आधार लिंक नसल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यात अडचण येऊ शकते. अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निधीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हातात थेट मदतीचा पैसा गेल्याने त्यांना शेतीसाठी आवश्यक तयारी करणे आणि कर्जफेड करणे सोपे होईल.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Sectorशेती क्षेत्रAgriculture Schemeकृषी योजना