-किरण शिंदे पुणे - कर्नाटकमध्येमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस चालकाला कन्नड भाषा न येण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध करत पुण्यात कर्नाटक सरकारच्या बसेसला काळे फासण्याचा प्रकार घडला. पुण्यात काही आंदोलनकर्त्यांनी कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळे फासले. तसेच, कर्नाटक सरकारने मराठी माणसाची माफी मागेपर्यंत त्यांच्या बसेस महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मराठी माणसाची माफी मागा; कर्नाटक एसटी बस चालकाच्या तोंडाला आंदोलनकर्त्यांनी काळे फासले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:38 IST