शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 12:05 IST

Ajit Pawar News: राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधीपक्षांनी आवाज उठवला आहे.  याच पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना उबाठाने येत्या ५ जुलैला मोर्चा काढण्याचे जाहीर केले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनीही हिंदी सक्तीला विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले की, "मी माझी भूमिका मांडली आहे. आज आमची कॅबिनेट असते, तिथे त्यावर आम्ही चर्चा करू. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना भाषा शिकता यावी, असे वाटत असते. मराठी ही आपली मातृभाषा आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुद्धा आपण मराठी अनिवार्य केली आहे. आता दुसऱ्या मुद्द्यावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत, प्रत्येक जण आपली भूमिका मांडत आहे. पहिलीमध्ये शिकणाऱ्यांना इंग्रजी आणि मराठी शिक्षण द्यावे आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावी. जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला हिंदी सुद्धा लिहिता वाचता येते.मराठी शिकले की हिंदी पण येते, लिपी तीच आहे. विद्यार्थी पाचवीपासून पण हिंदी शिकू शकतो."

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर अजित पवार म्हणाले की, "कोणी कोणाला विरोध करायचा? यात आमचा काय संबंध आहे. कोणी एकत्र यावे? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, यात आपण लोकांनी नाक खुपसायचे काय कारण आहे? आपण ही त्यांना म्हटले नव्हते की वेगवेगळे व्हा, त्यांनी काय करावे, त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, घटनेने सगळ्यांना अधिकार दिला आहे. मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. जेव्हा काही पक्ष एकत्र येऊन काम करतात तेव्हा मतप्रवाह असतो पण नंतर जेव्हा राज्याच्या हिताचे काय आहे? विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय आहे? या गोष्टी पहायच्या असतात."

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारण