पुणे : मध्य पूर्व आशिया देशात निर्माण झालेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबी, दुबईसाठी होणारी चार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रविवारी (दि. १) रोजी रद्द करण्यात आली. त्यामुळे पुण्याहून दुबई, अबुधाबी जाणाऱ्या प्रवाशांची नियोजित कामे रखडली. युद्धजन्य परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी खात्री करूनच तिकीट काढावी, असे आवाहन विमान कंपन्यांकडून करण्यात आले आहे.
इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये अचानक तणावपूर्ण परिस्थितीमुळे पुण्यासह संपूर्ण देशभरातून मध्य पूर्व भागात जाणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे रविवारी पुण्यातून अबुधाबी आणि दुबईला जाणाऱ्या चार विमाने रद्द करण्यात आली. यामध्ये स्पाइस जेट कंपनीचे (फ्लाइट क्रमांक - एसजी ५१) पुणे ते दुबई, रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी होणारे उड्डाण रद्द करण्यात आले. तसेच, एअर इंडिया एक्स्प्रेसचे (फ्लाइट क्र. आयएक्स २८३) पुणे ते अबुधाबी, रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी होणाऱ्या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. याशिवाय इंडिगो (फ्लाइट क्र. ६ ई १४८४/१४८३ दुबई - पुणे - दुबई, रात्री १०:३० वाजता येणारी आणि जाणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत.प्रवाशांना आगाऊ सूचना :
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विमान कंपन्यांनी या बदलाबाबत प्रवाशांना आगाऊ सूचना दिली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना तिकीट परतावा किंवा युध्दजन्य स्थिती संपल्यानंतरच्या पुढील तारखांचे पर्यायी उड्डाणांचे पर्याय दिले जात आहेत. विमानसेवा सुरू झाल्यावर प्रवाशांना कळविण्यात येणार आहे.
Web Summary : Due to Middle East tensions, four Pune-Dubai/Abu Dhabi flights were cancelled Sunday. Passengers faced disruptions; airlines advise checking before booking. Flights will resume when the situation stabilizes.
Web Summary : मध्य पूर्व में तनाव के कारण पुणे से दुबई/अबू धाबी जाने वाली चार उड़ानें रविवार को रद्द कर दी गईं। यात्रियों को परेशानी हुई; एयरलाइंस ने बुकिंग से पहले जांच करने की सलाह दी है। स्थिति स्थिर होने पर उड़ानें फिर से शुरू होंगी।