शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भक्तांचा होणार सुखद अन् सोयीस्कर प्रवास; गणेशोत्सवात पुणे ते सिंधुदुर्ग जादा उड्डाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:02 IST

कोकणातील गणपती उत्सव प्रसिद्ध आहे. पुण्यात कामानिमित्त स्थायिक असलेल्या अनेक कोकणवासीय गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूळ गावी जातात.

पुणे : गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. त्यामुळे एसटी, रेल्वे विभागाकडून जादा बस, एसटी गाड्यांची सोय करण्यात येते. आता विमान कंपनीकडून पुण्यातून सिंधुदुर्गला गणेशोत्सवात पाच दिवस जादा विमानसेवा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा गणेश भक्तांना होणार असून, फ्लाय ९१ विमान कंपनीकडून पुणे-सिंधुदुर्ग-पुणे अशी जादा उड्डाणे होणार आहेत, अशी माहिती फ्लाय ९१ चे व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी दिली.कोकणातील गणपती उत्सव प्रसिद्ध आहे. पुण्यात कामानिमित्त स्थायिक असलेल्या अनेक कोकणवासीय गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूळ गावी जातात. त्यामुळे प्रत्येक वर्षी एसटी महामंडळाकडून हजारो जादा लालपरी आणि रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. यंदाही जादा बस व विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले असून, त्याचे बुकिंगदेखील फुल्ल झाले आहेत. लोहगाव विमानतळ येथून सिंधुदुर्गसाठी थेट विमानसेवा आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दोन दिवस अगोदर गावी जाण्यासाठी तसेच परत येण्याची सोय होण्यासाठी त्यामुळे फ्लाय ९१ विमान कंपनीने पुणे ते सिंधुदुर्ग मार्गावर दि. २४, २९, ३१ ऑगस्ट आणि ५ व ७ सप्टेंबर रोजी अतिरिक्त उड्डाणे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होणार असून, भक्तांना बाप्पांचे दर्शन घेताना सुखद आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळावा म्हणून कंपनीने उड्डाणांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा गणेश भक्तांना होणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड