शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला चालना देण्यासाठी कृषी हॉकेथॉन; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:02 IST

- पर्यटनासाठी एक्सपोचेही केले जाणार आयोजन

पुणे : जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात कृषी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे देशभरातील पर्यटकांपर्यंत पोहचण्यासाठी नोव्हेंबरमध्ये पर्यटन एक्सपोचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात जिल्हाधिकारी डुडी बोलत होते. ते म्हणाले, योग्य नियोजन करण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. आजवर ज्या ज्या ठिकाणी काम केले, तेथे संवादावर जास्त भर दिला. प्रकल्पांची अंमलबजावणी करताना आणि प्रशासनामध्ये काम करताना काही चुका होत असतात. त्यावेळी संवाद साधून सूचनांचा स्वीकार केल्यास चुका दुरुस्ती करण्यास वाव मिळतो. जिल्हा प्रशासनाकडून शाळा, आरोग्य, पर्यटन, कृषी या चार गोष्टींवर काम करण्यात येणार आहे.पुण्यात कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी मोठी संधी आहे. पुण्यात कृषी विज्ञान केंद्र आहे. कृषीसाठी आपल्याकडे यंत्रणा आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राला फायद्यात आणण्याचे काम पुण्यातच होऊ शकते. शेतीतून उन्नती हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात कृषी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये २५ लाखाचे पहिले व १५ लाखाचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस दिले जाणार आहे.नोव्हेंबरमध्ये पर्यटन एक्सपो आयोजन पुणे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून पर्यटनाला पोषक गोष्टी एकाच ठिकाणी आहेत. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे जगातील पर्यटक आकर्षित होण्यासाठी त्याचे योग्य मार्केटिंग होणे गरजेचे आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये पर्यटन एक्सपो आयोजित केला जाणार आहे. पर्यटनाचा विकास करण्यासाठी जल पर्यटन विकसित केले जाणार आहे. याला परवानगी देताना प्रदूषण होणार नाही, याची हमी घेतली जाणार आहे. यातून पर्यटन क्षेत्रातील अर्थव्यवस्था बळकट होईल.जिल्हाधिकारी असेही म्हणाले..- आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र निर्माण करण्याचे नियोजन आहे. यासाठी शासनाकडून २०० कोटी रुपयाचा निधी मिळणार आहे. यामुळे मोठ्या रुग्णालयातील गर्दी कमी होऊन आरोग्य सुविधा सक्षम होतील.- महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मोजणी व नकाशासाठी कामे थांबणार नाहीत.- पीएमआरडीएचा डीपी रद्द झाल्याने काम सुरू असलेल्या प्रकल्पांना बाधा पोहचणार नाही, मात्र नवीन प्रकल्प सुरू करता येणार नाहीत.- औद्योगिक क्षेत्राला बाधा ठरणाऱ्या गुंडांचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्या