शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोची चाके गेली हवेत; साबळेवाडी घाट रस्ता अवजड वाहनांसाठी ठरतोय यमदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:37 IST

चाकण–शिक्रापूर हा रस्ता जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडतो. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा असल्याने बहुतांश वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत.

शेलपिंपळगाव : चाकण–शिक्रापूर रस्त्यावरील साबळेवाडी हद्दीतील घाट रस्ता अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः चाकणहून शिक्रापूरकडे जाताना असलेला तीव्र चढ वाहतुकदारांसाठी डोकेदुखी बनू लागला आहे. मंगळवारी (दि. १) सकाळी शिक्रापूरकडे जाणाऱ्या एका अवजड ट्रकमधून भर प्रवासादरम्यान लोखंडी सळया रस्त्यावर निसटल्या, त्यामुळे ट्रकची पुढची बाजू हवेत उचलली. सुदैवाने ट्रकच्या पाठीमागे कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली.अधिकच्या माहितीनुसार, चाकण–शिक्रापूर हा रस्ता जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडतो. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा असल्याने बहुतांश वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. औद्योगिक वसाहतींसाठी कच्चा माल परराज्यातून आणणारी अनेक मोठी वाहने सातत्याने येथूनच प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील साबळेवाडी व शेलपिंपळगाव येथील धोकादायक वळणे वाहतुकदारांसाठी जीवघेणी ठरत आहेत.विशेषतः साबळेवाडी हद्दीतील तीव्र घाट रस्ता पार करताना अवजड वाहनांना मोठी मेहनत करावी लागते. अनेक वाहनांना रस्ता पार होत नाही, त्यामुळे रस्त्याच्या मधोमध ही वाहने तासनतास उभी राहतात. परिणामी, इतर वाहतुकीला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. घाट रस्त्यात वाहन उभे असल्याने समोरून येणाऱ्या भरधाव वाहनांना अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे.अनेकदा वाहनांच्या चाकांना लावलेले दगड रस्त्यावरच पडलेले असतात, त्यामुळे दुचाकी तसेच आलिशान वाहनांना हे दगड घासले जाऊन अपघात होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या चौपदरीकरण कामादरम्यान साबळेवाडीचा वळण रस्ता सरळ करून चढ कमी करण्याची मागणी स्थानिक नागरिक तसेच वाहतूकदारांकडून केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात