शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Video : एक सेकंदात सगळं संपलं..!  सिमेंट मिक्सरखाली चिरडून १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू, CCTV व्हिडिओ समोर

By किरण शिंदे | Updated: March 10, 2026 11:17 IST

ती शिवबा चौकाजवळ पोहोचली असता पाठीमागून वेगाने येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

पुणे -  पुणे शहरालगत असलेल्या सुसगाव परिसरात मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या भीषण अपघातात १८ वर्षीय तरुणीचा सिमेंट मिक्सर ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. या दुर्घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणीचे नाव अंजली शंकर साळवे (वय १८) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (५ मार्च) सायंकाळी सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंजली साळवे ही आपल्या दुचाकीवरून सुस-नांदे रोड मार्गे जात होती. ती शिवबा चौकाजवळ पोहोचली असता पाठीमागून वेगाने येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर अंजलीचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ती रस्त्यावर कोसळली. दुर्दैवाने त्याच क्षणी ती थेट मिक्सर ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी उपस्थित नागरिकही काही क्षण स्तब्ध झाले. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यामध्ये अपघाताचा संपूर्ण प्रकार स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संबंधित ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुसगाव आणि परिसरात वाढत्या वाहतूक वेगामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण आणि कडक कारवाईची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: 18-Year-Old Crushed by Cement Mixer, CCTV Footage Surfaces

Web Summary : An 18-year-old girl died in Pune after being hit by a cement mixer truck. The accident occurred near Shiva Chowk, Sus-Nande Road. CCTV footage reveals the tragic incident. Police are investigating; locals cite concerns about speeding and demand stricter traffic control.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र