पुणे (यवत) : लोणी काळभोर येथे एर्टीगा कार आणि माल ट्रकच्या भीषण अपघातात यवत मधील नऊ युवकांचा मृत्यू झाला. मात्र या त्यापूर्वी त्यांनी व्हॉट्स ऍपवर लिहिलेले स्टेटस चटका लावून जाणारे आहे. जाण्यासाठी तयार (Ready To Go...) असे स्टेट्स त्यांनी टाकले आणि गेले ते कायमचेच !
एकाच वेळी गावातील नऊ युवक ठार झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.यवत स्टेशन भागातील विशाल सुभाष यादव , निखिल चंद्रकांत वाबळे , अक्षय चंद्रकांत घिगे , दत्ता गणेश यादव , स्टेशन रोड परिसरातील सोनू उर्फ नूर महंमद दाया , परवेझ अशपाक आत्तार , महालक्ष्मी नगर मधील अक्षय भारत वाईकर , गावठाण मधील जुबेर अजित मुलानी व कासुर्डी येथील शुभम रामदास भिसे यांचा भीषण अपघात जागीच मृत्यू झाला.
जाताना सेल्फी काढला तेथून काहीच अंतरावर घडला अपघात :या युवकांनी महामार्गालगत उभे राहत सेल्फी काढला होता.फिरून येत असताना मात्र जेथे सेल्फी काढला त्या ठिकाणापासून काही अंतरावरच काळाने त्यांच्यावर घाला घातला.